ड्रगवाली आंटीच्या कारनाम्याने  शिवराज सरकार चक्रावले ; १५ जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांची बोलावली तातडीची बैठक

मध्य प्रदेशातील इंदूर पोलिसांनी प्रीती जैन नावाच्या एका महिलेला अटक केली आहे. ही महिला ड्रगवाली आंटी नावाने परिचित असून तिच्या चौकशीमध्ये तिने जे खुलासे केले आहेत ते कारनामे ऐकून पोलिसांचंही डोकं गरगरायला लागलं आहे.

मध्य प्रदेशातील इंदूर पोलिसांनी प्रीती जैन नावाच्या एका महिलेला अटक केली आहे. ही महिला ड्रगवाली आंटी नावाने परिचित असून तिच्या चौकशीमध्ये तिने जे खुलासे केले आहेत ते कारनामे ऐकून पोलिसांचंही डोकं गरगरायला लागलं आहे. हे प्रकरण इतकं गंभीर असल्याने शिवराज सिंह चौहान यांनी तातडीची बैठक बोलवावी लागली. बैठकीसाठी १५ जिल्ह्याधिकारी आणि पोलीस अधीक्षक हजर होते. या बैठकीमध्ये ड्रगवाल्या आंटीचा म्हणजेच प्रीती जैनचाही विषय विस्ताराने चर्चिला गेला. चौहान यांनी या प्रकरणाची पोलीस महासंचालकांद्वारे चौकशी करण्यात यावी असे आदेश दिले आहेत. गुरुवारी पोलीस महानिरीक्षकांनी स्वत: पोलीस ठाण्यात जाऊन प्रीती जैनची चौकशी केली होती.

ही प्रीती जैन अवघ्या ५ वर्षांपूर्वी पुण्याहून इंदूर इथे स्थायिक झाली होती. ५ वर्षांत प्रीती जैन कोट्याधीश झाली असून तिने तिथल्या व्हीव्हीआयपी भागात एक आलिशान बंगलाही विकत घेतला आहे.मध्य प्रदेशात अंमली पदार्थांची विक्री आणि सेवन यांचे प्रमाणे चिंता वाटावी इतकं वाढलं आहे. ड्रग्ज तस्करांचं जाळं वाढत चाललं असून मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी या ड्रग्ज तस्करांचे कंबरडे मोडण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांची तातडीने बैठक बोलावली होती.