सीबीआय, ईडीच्या तलवारी उपसणारं केंद्र सरकार राज्यांच्या वादावेळी पळपुटेपणा दाखवतं सामनातून केंद्रावर टीका

कश्मीरप्रश्नी पाकिस्तानला दमदाट्या करून राजकीय माहोल निर्माण करता येतो. तसा राज्यांतर्गत प्रश्नी करता येत नाही हेच त्यामागचे कारण. प्रसंगी कटुता घेऊन न्याय करणारे रामशास्त्री बाण्याचे सरकार अजून देशात जन्माला यायचे आहे. तोपर्यंत राज्याराज्यांचे मिझोरामी झगडे सुरूच राहतील. गृहमंत्री शहा यांनी वेळीच पावले उचलून आसाम आणि मिझोराम या दोन राज्यांतील झगडा मिटवायलाच हवा. अन्यथा देशाच्या सीमेवर नवा संघर्ष अटळ आहे! असा सल्ला सामानातून केंद्र सरकारला देण्यात आला आहे.

    आसाम-मिझोराम वाद Asam Mizoram, महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद maharashtra karnataka border यांच्याप्रमाणे राज्यांमध्ये पाणीप्रश्न, जमिनीचा किंवा जंगलांचा वाद असेल तर केंद्र सरकार राजकीय सोय पाहून स्वतःची कातडी वाचवतं. एरवी आम्हीच तुमचे बाप म्हणून CBI, ED चं भय दाखवणारं केंद्र सरकार राज्यांच्या वादावेळी पळपुटेपणा दाखवतं, अशी टीका शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना Saamana Editorial या वृत्तपत्रातून केंद्र सरकारवर करण्यात आली आहे.

    गृहमंत्री अमित शहा Amit Shaha यांनी वेळीच पावले उचलून आसाम आणि मिझोराम या दोन राज्यांतील झगडा मिटवायलाच हवा. अन्यथा देशाच्या सीमेवर नवा संघर्ष अटळ आहे. आजच्या अग्रलेखातून आसामविरुद्ध मिझोराम झगड्यावर भाष्य करण्यात आलंय. याच अनुषंगाने केंद्र सरकारला सल्लेही देण्यात आलेले आहेत.

    भारतातील काही राज्यांत कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. तणावाचे विषय केंद्राशी संबंधित असल्यामुळे गृहमंत्री अमित शहा यांना विशेष लक्ष द्यावे लागेल. आसाम व मिझोराम ही ईशान्येकडील दोन राज्ये भारतावर नकाशावर आहेत, पण दोन राज्यांतील सीमावादाने उग्र स्वरूप धारण केले. भारत-पाकिस्तान किंवा चीनच्या सीमेवर दोन सैन्यांत गोळीबार, संघर्ष होतो, तसा रक्तरंजित लढा दोन राज्यांतील पोलिसांत झाला. त्यात काहीजणांचे बळी गेले.

    कश्मीरप्रश्नी पाकिस्तानला दमदाट्या करून राजकीय माहोल निर्माण करता येतो. तसा राज्यांतर्गत प्रश्नी करता येत नाही हेच त्यामागचे कारण. प्रसंगी कटुता घेऊन न्याय करणारे रामशास्त्री बाण्याचे सरकार अजून देशात जन्माला यायचे आहे. तोपर्यंत राज्याराज्यांचे मिझोरामी झगडे सुरूच राहतील. गृहमंत्री शहा यांनी वेळीच पावले उचलून आसाम आणि मिझोराम या दोन राज्यांतील झगडा मिटवायलाच हवा. अन्यथा देशाच्या सीमेवर नवा संघर्ष अटळ आहे! असा सल्ला सामानातून केंद्र सरकारला देण्यात आला आहे.

    Shivsena Sanjay Raut Suggestion Amit Shah through Saamana Editorial over Asam-Mizoram Conflict