धक्कादायक! आंतरजातीय विवाह केल्यांनतर तब्बल २८ वर्षांनी विवाहितेवर नवऱ्याच्या नातेवाईकांकडून हल्ला

बंगळुरुपासून ३८५ किलोमीटर दूर असलेल्या कर्नाटकमधील गडाग जिल्ह्यात हा प्रकार घडला आहे. घटनेत पतीच्या घरच्यांनी केलेल्या मारहाणीत महिला जखमी झाली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. मात्र, या प्रकरणात नावांचा खुलासा करण्यास पोलिसांनी नकार दिला.

    बंगळुरू : आपल्या भारतीय समाजात अजूनही जातीची धर्माची पाळेमुळे खोलवर रुतलेली आहेत. आंतरजातीय- धर्मीय विवाहांबाबत अजूनही लोक मनापासून स्वीकारत नाहीत. अशीच एक घटना बंगळुरू मध्ये घडली आहे . साधारणपणे २८ वर्षांपूर्वी आंतरजातीय विवाहकेलेल्या एका जोडप्याला नातेवाईकांकडूनच मारहाण झाली आहे. मुलाच्या घरचे स्वतःला उच्च जातीतील समजतात आणि याच कारणावरुन ही मारहाण झाली आहे. ही घटना ८ जुलै रोजी घडली आहे. बंगळुरुपासून ३८५ किलोमीटर दूर असलेल्या कर्नाटकमधील गडाग जिल्ह्यात हा प्रकार घडला आहे. घटनेत पतीच्या घरच्यांनी केलेल्या मारहाणीत महिला जखमी झाली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. मात्र, या प्रकरणात नावांचा खुलासा करण्यास पोलिसांनी नकार दिला.

    ही महिला वाल्मिकी समुदायाची असून ती अनुसूचित जमाती म्हणून वर्गीकृत आहे. कर्नाटकमध्ये अल्पसंख्याकांवरील अत्याचारात मोठी वाढ झाली आहे, अशातच आता ही घटना समोर आली आहे.