धक्कदायक! लग्नामुळे पसरला कोरोनाचा संसर्ग, वधूसह ९ जण पॉझिटिव्ह, वराचा मृत्यू

कोरोना विषाणू च्या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्या नियमांचे धिंडवडे काढीत शाही विवाह सोहळा नुकताच उत्तर प्रदेशातील फिरोजाबाद येथे पार पडला. मात्र या सोहळ्यामुळे वधूसह एकाच कुटूंबामधील ९ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आणि धक्कदायक बाब म्हणजे वराचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

कोरोना संक्रमित लोकांवर उपचार केले जात आहेत. १० दिवसांपूर्वीच दोघांचे लग्न झाले होते आणि लग्नानंतर ४ डिसेंबरला वराचा मृत्यू झाला.पीटीआयच्या म्हणण्यानुसार, वराला ताप आणि श्वास घ्यायला त्रास होत होता. मात्र, त्याची कोरोना टेस्ट झाली नव्हती. यानंतर संशयावरून जेव्हा कुटुंबीयांची कोरोना तपासणी केली गेली, तेव्हा नऊ लोकांना संसर्ग झाल्याचे समोर आले.मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता कुलश्रेष्ठ यांनी सांगितले की, या तरुणाचे २५ नोव्हेंबरला लग्न झाले होते. लग्नानंतर लगेचच या तरूणाची तब्येत ढासळली आणि 4 डिसेंबरला त्याचा मृत्यू झाला.त्यानंतर कोरोना चाचणीत वधूसह ९ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळले.यात वधूच्या सासूचा देखील समावेश आहे. या सर्वांवर सध्या उपचार सुरू आहेत. याशिवाय, गावातील इतर लोकांच्या कोरोनाची तपासणी करण्यासाठी वैद्यकीय शिबीरही लावण्यात आले आहे.