१ एप्रिलपासून खात्यातून पैसे काढल्यास २५ रुपये शुल्क आकारणार?, पोस्टाच्या ग्राहकांसाठी धक्कादायक बातमी, PIBकडून मोठा खुलासा…

पोस्ट ऑफिस आपल्या खातेदारांकडून खात्यातून पैसे काढण्यासाठी आणि पैसे जमा करण्यासाठी कोणतेही शुल्क आकारत नाही. पण सोशल मीडियावर (Social Media) याबद्दल एक मेसेज मोठ्या प्रमाणात व्हायरल होता आहे. हे लक्षात घेता PIB ने यासंदर्भात एक खुलासा केला आहे.

    नवी दिल्लीः पोस्ट ऑफिस या (Post Office) योजनांमध्ये कोट्यवधी लोकांनी गुंतवणूक केली आहे. पोस्ट ऑफिस आपल्या खातेदारांकडून खात्यातून पैसे काढण्यासाठी आणि पैसे जमा करण्यासाठी कोणतेही शुल्क आकारत नाही. पण सोशल मीडियावर (Social Media) याबद्दल एक मेसेज मोठ्या प्रमाणात व्हायरल होता आहे. हे लक्षात घेता PIB ने यासंदर्भात एक खुलासा केला आहे.

    सोशल मीडियावर एक मेसेज मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्या मेसेजमध्ये पोस्ट ऑफिस १ एप्रिलपासून खातेदारांकडून प्रत्येक रोख रक्कम काढण्यासाठी २५ रुपये वसूल करणार असल्याचं म्हटलं आहे. भारत सरकारचे अधिकृत ट्विटर हँडल पीआयबी फॅक्ट चेकने या वृत्ताचा सपशेल इन्कार केलाय. पीआयबीनं हा दावा खोटा असल्याचं सांगितलं आहे.

    मेसेजमधील हा दावा खोटा

    व्हायरल होणाऱ्या मेसेजमधील हा दावा खोटा असल्याचे पीआयबी फॅक्ट चेकमधून सिद्ध झालंय. तशी माहितीच पीआयबीनं ट्विट करत दिली आहे. इंडिया पोस्ट ऑफिसने खातेदारांकडून पैसे काढण्यासाठी कोणतेही शुल्क जाहीर केलेले नाही. पोस्ट ऑफिसद्वारे खातेदारांकडून रोख पैसे काढण्यासाठी कोणतीही फी आकारली जाणार नाही. अशा प्रकारचं ट्विट पीआयबीने केलं आहे.