धक्कादायक! ब्रिटनवरून आलेल्या पाच रुग्णांचा पोबारा

दिल्ली : ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा प्रकार आढळून आल्याने जगाने सावध भूमिका घेतली आहे. जगातील बहुतांश देशांनी ब्रिटनवरून येणारी विमानसेवा बंद केली आहे. कोरोनाच्या या नव्या प्रकाराचा संक्रमण वेग जास्त असल्याने भारतात येणारी विमान थांबवली आहेत. दरम्यान, बुधवारच्या अगोदर देशात आलेल्या प्रवाशांपैकी पाच कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांनी विमानतळावरूनच धूम ठोकली आहे.

दिल्ली : ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा प्रकार आढळून आल्याने जगाने सावध भूमिका घेतली आहे. जगातील बहुतांश देशांनी ब्रिटनवरून येणारी विमानसेवा बंद केली आहे. कोरोनाच्या या नव्या प्रकाराचा संक्रमण वेग जास्त असल्याने भारतात येणारी विमान थांबवली आहेत. दरम्यान, बुधवारच्या अगोदर देशात आलेल्या प्रवाशांपैकी पाच कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांनी विमानतळावरूनच धूम ठोकली आहे. दिल्ली विमानतळावर ही घटना घडली असल्याचे सांगण्यात येत आहे. ब्रिटनमधून येणाऱ्या प्रवाशांसाठी केंद्र सरकारने विशेष मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. या प्रवाशांना आरटी-पीसीआर चाचणी सक्तीची करण्यात आली आहे. असे असले तरी ब्रिटनहून दिल्लीत आलेल्या पाच प्रवाशांनी विमानतळावर उतरल्यानंतर अधिकाऱ्यांना चकमा देत पळ काढला. ही घटना समोर आल्यानंतर प्रशासनाने तातडीने त्यांचा शोध सुरू केला. त्यातील तीन जणांना शोधण्यात प्रशासनाला यश आले. रात्रीच त्यांना दिल्लीतील लोकनायक रुग्णालयात दाखल करण्यात आले. दुसरीकडे एक कोरोनाबाधित लुधियाना तर दुसरा आंध्र प्रदेशात जाण्यात यशस्वी ठरला. त्यांनाही बुधवारी अधिकाऱ्यांनी परत आणले आहे. पाचही जणांना क्वारंटाईन करण्यात आले आहे.

पाचपैकी एकजण अमृतसर येथील पंडोरी गावातील ४६ वर्षीय व्यक्तीचा मुलगा असून, तो ब्रिटनहून परत आला होता. त्याचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतरही तो दिल्ली विमानतळावरून लुधियानापर्यंत पोहोचण्यात यशस्वी ठरला. लुधियानात पोहोचल्यानंतर तो खासगी रुग्णालयात दाखल झाला होता. बुधवारी सकाळी त्याला पुन्हा दिल्लीला पाठवण्यात आले.