प्रतीकात्मक फोटो
प्रतीकात्मक फोटो

जबलपूर शहरातील प्रसिद्ध शाळा 'जॉय सीनियर सेकंडरी स्कुल'चा आहे. या शाळेच्या संचालकाचं नाव अखिलेश मेबन असून त्यांनी शाळेची फी वसूल करण्यासाठी गुंडगिरीचा अवलंब केला आहे. यावेळी त्यांनी संबंधित विद्यार्थ्याच्या पालकाला एका बंद खोलीत बोलावून त्यांना गार्डद्वारे गोळी मारण्याचे आदेश दिले आहेत. त्याचबरोबर पालकांना शिवीगाळही केली आहे.

    जबलपूर : कोरोना आणि लॉकडाऊमुळे आधीच शिक्षणाचा खेळखंडोबा झाला आहे. आत्ता अनेक ठिकाणी शाळा सुरू झाल्या असल्या तरी अनेक ठिकाणी अजूनही शाळा बंद आहेत. पण ऑनलाईन शिक्षण सुरु आहे. त्यात आता खासगी शाळांनी फी वसुलीसाठी पालकांचा छळ सुरू केला आहे. उत्तरप्रदेश येथील जबलपूरमध्ये फी वसुलीसाठी खाजगी शाळेकडून धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. येथील शाळा संचालकाने गुंडगिरी करत पालकांना एका रुममध्ये बोलावून त्यांच्यावर बंदूक रोखून जीवे मारण्याची धमकी दिली आहे. विद्यार्थ्यांची शाळेची फी वसुल करण्यासाठी अशा पद्धतीनं पालकांना धमकावल्यानंतर पीडित पालकांनी शाळेच्या संचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पण अद्याप शाळेच्या संचालकाला अटक करण्यात आली नाही.

    संबंधित गैरप्रकार जबलपूर शहरातील प्रसिद्ध शाळा ‘जॉय सीनियर सेकंडरी स्कुल’चा आहे. या शाळेच्या संचालकाचं नाव अखिलेश मेबन असून त्यांनी शाळेची फी वसूल करण्यासाठी गुंडगिरीचा अवलंब केला आहे. यावेळी त्यांनी संबंधित विद्यार्थ्याच्या पालकाला एका बंद खोलीत बोलावून त्यांना गार्डद्वारे गोळी मारण्याचे आदेश दिले आहेत. त्याचबरोबर पालकांना शिवीगाळही केली आहे.

    यानंतर संबंधित पालकाने पोलीस ठाण्यात जाऊन गुन्हा दाखल केला आहे. आरोपी संचालकाविरूद्ध धमकी देण्यासोबत अन्य कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. अद्याप संबंधित शाळा संचालकाला अटक केलेली नाही. दुसरीकडे पीडित सत्यम तिवारीनं संचालकाविरुद्ध सक्तीची कारवाई करण्याची मागणी केली आहे.

    .