prakash jawadekar

देशात सर्वत्र लॉकडाऊन झाल्यामुळे कोरोनाचा सर्वाधिक फटका चित्रपट आणि मालिकांच्या चित्रिकरणाला बसला होता. परंतु आता केंद्र सरकारने जारी केलेल्या नियमावलीमध्ये चित्रपट आणि मालिकांचं शूटिंग लवकरच सुरू करता येणार आहे. ही नियमावली केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली आहे

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव देशभरात मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे कोरोनाला आळा घालण्यासाठी अनेक कंपन्या, दुकाने, कारखाने आणि चित्रपटसृष्टी आदि. प्रकारच्या अनेक गोष्टी बंद करण्यात आल्या होत्या. तसेच देशात सर्वत्र लॉकडाऊन झाल्यामुळे कोरोनाचा सर्वाधिक फटका चित्रपट आणि मालिकांच्या चित्रिकरणाला बसला होता. परंतु आता केंद्र सरकारने जारी केलेल्या नियमावलीमध्ये चित्रपट आणि मालिकांचं शूटिंग लवकरच सुरू करता येणार आहे. ही नियमावली केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली आहे.

या नियमावलीमध्ये काही मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत – 

या मार्गदर्शक सूचनांमुळे या उद्योगाशी संबंधित कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी मदत होणार आहे, असे प्रकाश जावडेकर यांनी म्हटले आहे. या सूचनांमध्ये सर्व ठिकाणी मास्कचा वापर आणि सोशल डिस्टन्सिंग पाळणे सक्तीचे करण्यात आले आहे, सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन आवश्यक आहे.

वस्तू शेअर करताना ग्लोव्ह्ज घालावेत. सेटवर प्रेक्षकांना परवानगी मिळणार नाही. माइकच्या डायप्रामशी थेट संपर्क ठेवू नये, प्रॉप्सचा वापर कमीतकमी व्हावा, वापरानंतर सॅनिटायझेशन आवश्यक आहे, तसेच चित्रिकरणादरम्यान कमीतकमी कलाकार आणि तंत्रज्ञ असावेत. परंतु कॅमेऱ्यासमोरच्या व्यक्तीने मास्क घालणे गरजेचे नाही. अशा प्रकारची नियमावली स्पष्ट करण्यात आली आहे.