फोटो : ट्विटर
फोटो : ट्विटर

व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्या मनात सैन्यातील सैनिकांबद्दल आदर वाढेल. व्हिडिओमध्ये एक दुकानदार त्याच्या दुकानाबाहेर झोपलेल्या एका वृद्ध स्त्रीशी अमानुषपणे वागतो आहे हे पाहून लष्करी जवानाने दुकानदाराला असा धडा शिकवला आणि जवानाने त्या वृद्ध महिलेवर आईसारखी मायाही दाखवली हे पाहून तुमचाही उर भरून येईल आणि जवानाला सॅल्यूट कराल.

    सैन्यातील जवानांचे अनेक हृदयस्पर्शी व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. लष्कराचे जवान केवळ सीमेवरच नसतात, ते लोकांना संरक्षण देण्यासाठी, मदत करण्यासाठी सर्वत्र तैनात असतात. आजकाल अशाच एका तरुणाचा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे. हे पाहिल्यानंतर लोक स्वतःला त्या तरुणाची स्तुती करण्यापासून रोखू शकले नाहीत.

    व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्या मनात सैन्यातील सैनिकांबद्दल आदर वाढेल. व्हिडिओमध्ये एक दुकानदार त्याच्या दुकानाबाहेर झोपलेल्या एका वृद्ध स्त्रीशी अमानुषपणे वागतो आहे हे पाहून लष्करी जवानाने दुकानदाराला असा धडा शिकवला आणि जवानाने त्या वृद्ध महिलेवर आईसारखी मायाही दाखवली हे पाहून तुमचाही उर भरून येईल आणि जवानाला सॅल्यूट कराल.

    व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, एक महिला मार्केटमध्ये एका दुकानाबाहेर झोपली आहे. दुकानाचा मालक तेथे आल्यावर तिला सर्वप्रथम लाथ मारतो. त्यानंतरही ती स्त्री उठत नाही हे पाहिल्यावर तिच्या तोंडावर बाटलीतलं पाणी शिंपडतो. पाणी टाकल्यावर ती महिला उठते आणि दुकानदाराचे पाय धरते. एवढं होऊनही दुकानदार दुकान उघडण्यासाठी त्या महिलेला तेथून पळवून लावण्याचा प्रयत्न करतो.

    एवढ्यात पत्नीसोबत येत असलेल्या सैन्यातील जवानाची नजर त्या महिलेवर पडते. सर्वप्रथम या जवानाने दुकानदाराला असं करू नको चांगलाच दम दिला आणि त्याला तसं करण्यापासून परावृत्त केलं. यानंतर बेघर असलेल्या महिलेला आधार देत तिला उभं केलं आणि तिला कपडे आणि चप्पल घालायला दिली.

    हा व्हिडिओ ट्विटरवर IAS अधिकारी अवनीश शरण यांनी शेअर केला आहे. व्हिडिओ सोबतच कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, या लष्करी जवानाला सॅल्यूट करतो. व्हिडिओ लोकांना खूपच आवडला आहे. या लष्करी जवानाची ते स्तुती करत आहेत. व्हिडिओला आतापर्यंत ५० हजार व्ह्यूज मिळाले आहेत. हा व्हिडिओ १० हजारांहून अधिक लोकांनी लाइक केला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.