shrikant datar

अमेरिकेच्या प्रसिद्ध हार्वर्ड बिझिनेस स्कूलच्या (Harvard Business School) अधिष्ठाता (डीन) पदी भारतीय वंशाचे श्रीकांत दातार (Shrikant Datar) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दातार भारतीय वंशाच्याच असलेल्या नितीन नोहरीयाची जागा घेतील. १ जानेवारी २०२१ पासून दातार (Dean) या पदी रुजू होतील. हार्वर्ड बिझिनेस स्कूलचे अध्यक्ष लॅरी बाको यांनी याबाबत माहिती दिली की, “आर्थर लोव्हस डिकिन्सन बिझिनेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशनचे प्राध्यापक आणि हार्वर्ड बिझिनेस स्कूल (एचबीएस) येथील विद्यापीठातील वरिष्ठ सहकारी डीन श्रीकांत दातार हे हॉवर्ड बिझनेस स्कूलचे पुढील डीन असतील.

यावेळी बोलताना लॅरी बाको म्हणाले की, “श्रीकांत दातार एक नाविन्यपूर्ण शिक्षक, एक प्रतिष्ठित विद्वान आणि एक अनुभवी प्राध्यापक आहेत. व्यावसायीक शिक्षणाच्या भवितव्याविषयी ते अग्रगण्य विचारवंत म्हणून प्रसिद्ध आहेत. तसंच करोना महासाथीदरम्यान उद्र्भवलेल्या आव्हानंचा सामना करण्यासाठी हॉवर्ड बिझनेस स्कुलमध्ये त्यांनी मोलाची भूमिका बाजवली आहे. हॉवर्ड बिझनेस स्कूलमध्ये गेली २५ वर्षे त्यांनी अनेक पदांवर आपली सेवा बजावली असल्याचंही त्यांनी नमूद केलं.

जाणून घ्या दातार यांच्या जीवनाविषयी

श्रीकांत दातार १ जानेवारी रोजी हार्वर्ड बिझिनेस स्कूलच्या डीन पदाचा पदभार स्वीकारणार आहेत. दातार यांनी मुंबई विद्यापीठातून आपलं सुरूवातीचं शिक्षण पूर्ण केलं. १९७३ मध्ये ते उत्तीर्ण झाले. चार्टर्ड अकाउंटंट झाल्यानंतर त्यांनी आयआयएम अहमदाबाद येथून पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा घेतला. त्यानंतर दातार यांनी स्टॅनफोर्ड विद्यापीठातून सांख्यिकी आणि अर्थशास्त्र विषयात पीएचडी केली.

दातार १९८४ ते १९८९ पर्यंत कार्नेगी मेलॉन ग्रॅज्युएट स्कूल ऑफ इंडस्ट्रियल ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये सहयोगी प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. त्यानंतर ते १९९६ पर्यंत स्टॅनफोर्ड विद्यापीठाच्या बिझिनेस स्कूलमध्ये त्यांनी प्राध्यापक म्हणून सेवा बजावली. दातार हे आयआयएम कोलकाताच्या गव्हनिंग बॉडीचाही एक भाग आहेत. दातार हे हॉवर्ड बिझनेस स्कूलचे ११ डीन असतील.