शुभेंदू अधिकारी यांचे ममता बॅनर्जींच्या बालेकिल्ल्यावर लक्ष  ; एकेकाळी जेथे होता प्रभाव तेथेच तृणमूलचे वर्चस्व मोडित काढणार शुभेंदू

कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये अद्याप अधिकृतरित्या निवडणुकांचा बिगुल वाजलेला नसला तरी राजकीय पक्षांमध्ये रणधुमाळी सुरूच आहे. शुभेंदू अधिकारी यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर राजकीय वातावरण तप्त झाले असून आता सभांनाही जोर चढलेला आहे

कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये अद्याप अधिकृतरित्या निवडणुकांचा बिगुल वाजलेला नसला तरी राजकीय पक्षांमध्ये रणधुमाळी सुरूच आहे. शुभेंदू अधिकारी यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर राजकीय वातावरण तप्त झाले असून आता सभांनाही जोर चढलेला आहे. तृणमूल काँग्रेस पक्षाने शुभेंदू अधिकारी यांचा बालेकिल्ला असलेल्या मिदनापूर जिल्ह्यातील कोंताई येथे रॅली काढून शक्तिप्रदर्शन केले व त्यांच्यावर निशाणा साधला त्याच ठिकाणी शुभेंदू अधिकारीही आपली राजकीय ताकद दाखवून देणार आहे. शुभेंदू अधिकारी भाजपात गेल्यानंतर आता जेथे -जेथे तृणमूलचे वर्चस्व होते तेथील वर्चस्व मोडित काढण्यावर त्यांचा भर असेल असे मिदनापूरमध्ये घेणार पहिली सभा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपात सहभागी झाल्यानंतर शुभेंदू अधिकारी यांची पहिली सभा मिदनापूर येथे होणार आहे. या सभेला राज्याचे भाजपा युवा वंगचे अध्यक्ष सौमित्र खानही उपस्थिती रहाणार आहे. उल्लेखनीय असे की सौमित्र खान यांच्या पत्नीने तृणमूलमध्ये प्रवेश केला असून त्यांनी पत्नीला घटस्फोटाची नोटिसही बजावली आहे. यापूर्वी शुभेंदू अधिकारी यांनी भाजपा नेते म्हणून आपली पहिली सभा बर्धवान येथे केली होती.

राजकारणात कुटुंबीयांचे वर्चस्व

शुभेंदू अधिकारी हे केवळ ममता बॅनर्जी यांचे खास मानले जात नाहीत तर ते टीएमसीचे खास रणनीतीकारही होते. पूर्व मिदनापूरमध्ये टीएमसीच्या विकासात अधिकारी आणि त्याच्या कुटुंबाची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. अधिकारी यांचे कुटुंब राजकीयदृष्ट्या बळकट असून जिल्ह्यातील बहुतेक विधानसभा जागांवर त्यांची मजबूत पकड आहे. कांथी आणि तामलूक लोकसभा मतदारसंघात व जिल्ह्यातील अधिकांश विधानसभा मतदारसंघातील स्थानिक स्वराज्य संस्थांवर शिशिर अधिकारी आणि त्यांची तीन मुले यांचे 2009 पासून नियंत्रण आहे. शुभेंदू अधिकारी यांचा भाऊ दिब्येंदु तमलूक येथून लोकसभा सदस्य आहे तर तीन भाऊ- बहिणींपैकी सर्वात लहान लहान सौमेंदु कांथी नगर पालिकेचे अध्यक्ष आहेत. त्यांचे वडील शिशिर अधिकारी तृणमूलचे वरिष्ठ लोकसभा सदस्य असून ते कांथी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात.