तो दूध घालण्यासाठी तिच्या घरी जात होता, घरच्यांना त्यांच्या प्रेमाची कुणकुण लागली; त्याच्या खिशातल्या फोटोने घात केला आणि…

राजवीर सिंह असे मृत्यू व्यक्तीचे नाव आहे. राजवीर दूध विकायचा. त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या पत्नीने पोलिस ठाण्यात अज्ञात लोकांविरूद्ध गुन्हा दाखल केला. घटनेची माहिती देताना एसपी धरमवीर सिंग यांनी सांगितले की, २६ जून रोजी खातापुर गावात एका व्यक्तीचा मृतदेह आढळला. त्याला गोळ्या घालून ठार मारण्यात आले होते.

  बिजनौर : युपीच्या बिजनौर भागातून एक खळबळजनक घटने समोर आली आहे. येथे एका दुधाच्या व्यापार करणाऱ्या तरुणाची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. या हत्येचा खुलासा एखाद्या सिनेमाप्रमाणे झाला आहे. पोलिसांनी मृताचा तपास केला असता, त्याच्याकडे एक फोटो सापडला आणि या फोटोच्या मदतीने पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. आपल्या बहिणीच्या प्रेमसंबंधामुळे संतापलेल्या १६ वर्षांच्या अल्पवयीन मुलाने ही हत्या केली होती.

  राजवीर सिंह असे मृत्यू व्यक्तीचे नाव आहे. राजवीर दूध विकायचा. त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या पत्नीने पोलिस ठाण्यात अज्ञात लोकांविरूद्ध गुन्हा दाखल केला.

  घटनेची माहिती देताना एसपी धरमवीर सिंग यांनी सांगितले की, २६ जून रोजी खातापुर गावात एका व्यक्तीचा मृतदेह आढळला. त्याला गोळ्या घालून ठार मारण्यात आले होते.

  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृताचा शोध घेतला असता, त्याच्या खिशात एक पर्स, काही पैसे, त्याचे आधार कार्ड आणि मुलीचा फोटो सापडला. पोलिसांना त्याच्या खिशातून दागिन्यांचा नवीन बॉक्सही सापडला.

  जेव्हा पोलिसांकडून मुलीचा शोध घेतला गेला, तेव्हा त्यांना कळले की, राजवीर त्या मुलीकडे दूध देण्यासाठी घरी जायचा. तेव्हाच तो तिच्या प्रेमात पडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलीच्या भावाला राजवीर आणि त्याच्या बहिणीच्या प्रेमसंबंधांची माहिती मिळाली. त्यामुळे त्याने या राजवीरची हत्या केली.

  संशयाच्या आधारे पोलिसांनी मुलीच्या भावाला ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली. सुरुवातीला त्याने काहीही कबूल केले नाही, परंतु जेव्हा पोलिसांनी सक्तीने त्याच्याकडे विचारपूस केली असता, त्याने आपला गुन्हा मान्य केला.

  या अल्पवयीन आरोपीने सांगितले की, त्याचे मित्र त्याच्या बहिणीची या राजवीर सोबत अवैध संबंध आहेत म्हणून त्याची चेष्टा करत होते. यानंतर त्याने मित्रांसह राजवीरच्या हत्येची योजना आखली.

  sister was having love affair with milkman 16 year old minor boy killed man