बहिणीला मारलं, तिने केली भावांकडे तक्रार मग मेहुण्यांनी दाजींना एवढं कूट-कूट कुटलं की, विचारायची सोयच नाही

टिंकू नावाच्या एका व्यक्तीनं पोलिसांत तक्रार दिली आहे, की त्याच्या पत्नीच्या दोन भावांनी त्याचे हात-पाय बांधले यानंतर तोंडात कापडाचा बोळा घालून त्याला अमानुष मारहाण केली. पोलिसांनी जखमीला रुग्णालयात दाखल केलं आहे, यासोबतच त्याच्या दोन मेहुण्यांविरोधात गुन्हा दाखल करून घेतला आहे.

  जयपूर : दोन युवकांनी आपल्याच दाजीला धू-धू धुतलं आहे. या पीडिताच्या घरचे घराबाहेर उभा राहून घटनेचा व्हिडिओ (Video) काढत आहेत, तसंच त्याला सोडण्याची विनंती करत आहेत. पीडित व्यक्तीच्या नातेवाईकांनी घटनेचा व्हिडिओ शूट करून पोलिसांकडे तक्रार (Police Complaint) दिली आहे. ही घटना राजस्थानच्या (Rajasthan) भरतपूरमधील आहे. मथुरा गेट ठाण्याच्या परिसरातील गोपालगढ येथे ही घटना घडली आहे.

  टिंकू नावाच्या एका व्यक्तीनं पोलिसांत तक्रार दिली आहे, की त्याच्या पत्नीच्या दोन भावांनी त्याचे हात-पाय बांधले यानंतर तोंडात कापडाचा बोळा घालून त्याला अमानुष मारहाण केली. पोलिसांनी जखमीला रुग्णालयात दाखल केलं आहे, यासोबतच त्याच्या दोन मेहुण्यांविरोधात गुन्हा दाखल करून घेतला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित व्यक्तीचं लग्न दोन वर्षांपूर्वी मडरपुर गावातील एका तरुणीसोबत झालं होतं. मात्र, त्याचं बऱ्याचदा कोणत्या ना कोणत्या कारणानं पत्नीसोबत भांडण होत असे. असा आरोप आहे, की हा व्यक्ती आपल्या पत्नीला मारहाण करत असे यामुळे ती या त्रासाला कंटाळली होती.

  या महिलेनं तिला होणाऱ्या मारहाणीबाबत आपल्या भावांना माहिती दिली. यानंतर दोन्ही भावांनी मिळून दाजीची धुलाई केली. पीडित व्यक्तीनं असा आरोप केला आहे, की त्याचे दोन्ही मेहुणे घरी आले आणि दाजीला एका रूममध्ये घेऊन गेले. यानंतर त्याला पलंगावर झोपवलं आणि त्याचे हात-पाय बांधले, यानंतर तोंडात बोळा घातला आणि त्याला बेदम मारहाण केली. त्यानं वाचण्याचा प्रयत्न केला मात्र दोघांनीही त्याला सोडलं नाही.

  पोलीस सध्या दोन्ही आरोपींचा शोध घेत आहेत. याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली आहे. हे दोन्ही कुटुंबांमधील प्रकरण असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. व्हिडिओचा तपास सुरू आहे. दोन्हीकडच्या लोकांची चौकशी केली असात असं समोर आलं आहे, की पती आणि पत्नी यांच्यात सतत कोणत्या ना कोणत्या मुद्द्यावरुन वाद होत असे. महिलेनं सांगितलं, की तिचा पती तिला मारहाणही करतो. याच कारणामुळे दोघा भावांनी दाजींना बेदम चोपलं.

  sisters husband beaten by brother in law due to family dispute

  वाचकहो, तुम्हाला ही बातमी आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.