चिमुकल्याच्या तोंडून झोपेतच निघालेले ते शब्द ऐकून नेटकरी झाले भावुक अन् VIRAL VIDEO

व्हिडिओमध्ये दिसत की एक लहान आणि क्युट मुलगा झोपलेला आहे. त्याची निगरासता पाहूनच अनेकजण फिदा झाले आहेत. अशातच झोपेतच ज्याप्रकारे तो आपल्या आईला हाक मारत आहे, ते पाहून नेटकरीही चकित झाले आहेत. तुम्हीही हा क्युट व्हिडिओ नक्की पाहा.

    नवी दिल्ली : लहान मुलं ही देवाचं रूप असतात, असं म्हटलं जातं. त्यांच्या मनामध्ये कोणतीही वाईट भावना नसते. लहान मुलांच्या आवाजानंच घरामध्ये आनंदाचं वातावरण पसरतं आणि प्रत्येक आई-वडील आपल्या मुलावर जीवापाड प्रेम करत असतात. लहान मुलांची निरागसता आणि भोळेपण पाहून कोणालाही त्यांचं कौतुक वाटतं. लहान मुलांचे मजेशीर व्हिडिओ (Funny Videos of Baby) अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल (Viral on Social Media) झाल्याचंही पाहायला मिळतं. काही व्हिडिओ तर इतके क्युट असतात, की ते वारंवार पाहण्याची इच्छा होते. असाच आणखी एक व्हिडिओ आता समोर आला असून यातील चिमुकल्यानं नेटकऱ्यांची मनं जिंकली आहेत.

    अनेकदा लोक लहान मुलांची निरागसता पाहून विचारात पडतात. तर, अनेकदा त्यांची मस्तीदेखील लोकांचं मन जिंकते. सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमधील निरागस मुलाचा अंदाज लोकांना भावुक (Emotional Video of Baby) करत आहे. या व्हिडिओमध्ये दिसत की एक लहान आणि क्युट मुलगा झोपलेला आहे. त्याची निगरासता पाहूनच अनेकजण फिदा झाले आहेत. अशातच झोपेतच ज्याप्रकारे तो आपल्या आईला हाक मारत आहे, ते पाहून नेटकरीही चकित झाले आहेत. तुम्हीही हा क्युट व्हिडिओ नक्की पाहा.

    हा व्हिडिओ तुमच्याही नक्कीच पसंतीस पडला असेल. व्हिडिओवर नेटकरी कमेंटचा अक्षरशः वर्षाव करत आहेत. ट्विटरवर हा व्हिडिओ ‘Rex Chapman’ नावाच्या अकाऊंटवरून शेअर केला गेला आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत तब्बल नऊ लाखाहून अधिकांनी पाहिला आहे. या क्युट व्हिडिओवर अनेक मजेशीर कमेंट येत आहेत.