indian army

भारतीय सेनेच्या ३४ आरआर, पोलीस आणि सीआरपीएफने मिळून यशस्वी केली. या मोहीमेत जवानांनी एके-४७ रायफलसह तीन पिस्तूलं देखील हस्तगत केली आहेत.

    जम्मू-काश्मीरमधील शोपियांमध्ये झालेल्या चकमकीत भारतीय जवानांनी धडाकेबाज कामगिरी केली आहे. या चकमकीत त्यांनी चार दहशतवाद्यांचा खात्मा केला असल्याची माहिती मिळत आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, शोपियांच्या मनिहाल गावात चार दहशतवाद्यांना चकमकीत ठार करण्यात आलं. काश्मीर झोनच्या पोलिसांनी सांगितलं की, ठार करण्यात आलेले दहशतवादी लश्कर ए तोयबा या संघटनेशी निगडीत होते. ही संयुक्त मोहीम भारतीय सेनेच्या ३४ आरआर, पोलीस आणि सीआरपीएफने मिळून यशस्वी केली. या मोहीमेत जवानांनी एके-४७ रायफलसह तीन पिस्तूलं देखील हस्तगत केली आहेत.