तिसऱ्या टी-२० साठी प्रेक्षकांना स्टेडियममध्ये प्रवेश बंदी ; प्रेक्षक नाराज

भारत-इंग्लंड यांच्यातील चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना प्रेक्षकांविना खेळविण्यात आला होता. मात्र त्यानंतरचे तीन कसोटी सामने आणि पहिले दोन टी-२० सामने स्टेडियम क्षमतेच्या ५० टक्के प्रेक्षक उपस्थितीने खेळविण्यात आले होते.

    अहमदाबाद : ‘नरेंद्र मोदी स्टेडियमवर १६ मार्च, १८ मार्च आणि २० मार्च रोजी भारत विरुद्ध इंग्लंड टी-२० सामने खेळविण्यात येणार असून या सामन्यांसाठी प्रेक्षकांना प्रवेशबंदी आहे. या सामन्यांसाठी तिकिट घेतलेल्या सर्व प्रेक्षकांना पैसे परत करण्यात येतील,’ असे सांगण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्र, केरळ, पंजाब, कर्नाटक आणि गुजरात येथे कोरोना प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाल्याचे दिसून आले.या पार्शवभूमीवर हा निर्णय घेण्यात येत असल्याचे जीसीएचे उपाध्यक्ष धनराज नथवानी यांनी सांगितले. मात्र मॅच पाहण्यासाठी आधीच प्रेक्षकी आले असल्याने त्यांची घोर निराशा झाली आहे.

    मात्र हि घोषणा जेव्हा करण्यात आली तेव्हा अनेकजण सामना पाहण्यासाठी अहमदाबादला दाखल झालेले होते तर काहीजण प्रवास करीत होते, त्यामुळे त्यांना याबाबत कोणतीही माहिती मिळाली नाही.मध्य प्रदेशातील झाबुआ येथून अहमदाबादला आलेल्या वीरेंद्र बेसर यांनी सांगितले की, आमचे पाच मित्र सोमवारी सायंकाळी रेल्वेने अहमदाबादला गेले होते. मंगळवारी सकाळी अहमदाबादला पोहोचल्यावर स्टेडियममध्ये प्रेक्षकांच्या प्रवेशावर बंदी घालण्यात आली असल्याचे दिसून आले. आम्ही येथे आलो आहोत आणि आता सामना न पाहता घरी परत यावे लागेल. याबद्दल आम्ही खूप निराश झालो आहोत.

    याआधी भारत-इंग्लंड यांच्यातील चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना प्रेक्षकांविना खेळविण्यात आला होता. मात्र त्यानंतरचे तीन कसोटी सामने आणि पहिले दोन टी-२० सामने स्टेडियम क्षमतेच्या ५० टक्के प्रेक्षक उपस्थितीने खेळविण्यात आले होते.