एसएससी जीडी कॉन्स्टेबल 25 हजार जागांवर भरती, अर्ज कसा करायचा? : जाणून घ्या एका क्लिकवर

    नवी दिल्ली : स्टाफ सिलेक्शन कमिशन ने CAPF मधील कॉन्स्टेबल, SSF आणि आसाम रायफल्स मध्ये रायफलमन या पदांसाठी अर्ज करण्यासाठी अखेरचा दिवस आहे. एसएससीनं जीडी कॉन्स्टेबल भरतीसाठी नोटिफिकेशन 17 जुलै रोजी जारी केलं होतं. एकूण 25 हजार पदांवर भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे.

    किती पदांवर भरती आहे?

    स्टाफ सिलेक्शन कमिशननं यावेळी 25271 पदांसाठी अर्ज मागवले आहेत. भरती प्रक्रियेत पुरुष उमेदवारांसाठी 22424 जागा आहेत तर, महिला सांठी 2847 पद आहेत. इच्छुक आणि योग्य उमेदवार ऑफिशियल वेबसाईट ssc.nic.in वर जाऊन ऑनलाईन अर्ज दाखल करु शकतात. अर्ज दाखल करण्याची अखेरची तारीख 31 ऑगस्ट 2021 ही आहे. तर, अर्जाचं शुल्क ऑनलाईन जमा करण्याची अखेरची मुदत 2 सप्टेंबर तर चलनाद्वारे सादर करण्याची अखेरची मुदत 7 सप्टेंबरपर्यंत आहे.

    महत्वाच्या तारखा

    अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होण्याची तारीख – 17 जुलै
    ऑनलाईन अर्ज दाखल करण्याची अखेरची तारीख- 31 ऑगस्ट (रात्री 11.30 वाजेपर्यंत)
    ऑनलाईन फी जमा करण्याची अखेरची तारीख – 2 सप्टेंबर (रात्री 11.30 वाजता)
    ऑफलाईन चलन जनरेट करण्याची अखेरची तारीख- 4 सप्टेंबर (रात्री 11.30 वाजता)
    चलनाद्वारे फी जमा करण्याची अखेरची तारीख – 7 सप्टेंबर
    टियर – 1 परीक्षा (सीबीटी) चे तारीख- नंतर कळवली जाणार आहे

    विभागानुसार पदसंख्या

    बीएसएफ: 7545
    सीआयएसएफ : 8464
    एसएसबी : 3806
    आयटीबीपी :1431
    आसाम रायफल्स: 3785
    एसएसएफ: 240
    यावेळी सीआरपीएफ आणि एनआयएमध्ये कोणत्याही जागा निघालेल्या नाहीत.

    वयोमर्यादा

    ज्या उमेदवारांचं वय 18 ते 23 वर्षांच्या दरम्यान असेल ते अर्ज दाखल करु शकतात.

    शारीरिक पात्रता

    उंची
    पुरुष उमेदवार – 170 सेमी.
    महिला उमेदवार – 157 सेमी.

    पात्रता

    स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या सीएपीएफ जीडी कॉन्स्टेबल पदासाठी अर्ज करणारे उमेदवार 10 वी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे.

    छाती
    पुरुष उमेदवार – 80 सेमी. (फुगवून – 85 सेमी)

    पगार

    उमेदवारांची निवड झाल्यानंतर त्यांना पे लेवल -3 च्या प्रमाणे 21700-69100 रुपये पगार मिळणार आहेत.

    अर्ज कुठे सादर करायचा?

    स्टाफ सिलेक्शन कमिशनची ऑफिशियल वेबसाईट ssc.nic.in वर जाऊन ऑनलाईन अर्ज दाखल करु शकतात.

    अर्ज कसा दाखल करायचा?

    स्टेप 1: सर्वप्रथम उमेदवारांनी स्टाफ सिलेक्शन कमिशनची वेबसाईट ssc.nic.in ला भेट द्यावी
    स्टेप 2: यानंतर SSC Constable GD Recruitment 2021 या लिंकवर क्लिक करा
    स्टेप 3: वेबसाईट मोबाईल नंबर, वैयक्तिक माहिती आणि ईमेल द्वारे नोंदणी करा
    स्टेप 4: संपूर्ण अर्ज भरल्यानंतर फी जमा करुन अर्ज सबमिट करा
    स्टेप 5: अर्जाची प्रिटं आऊट घेऊन पुढील माहितीसाठी सोबत ठेवा