सुब्रह्मण्यम स्वामींचा भाजपाला घरचा आहेर, म्हणाले ४० रुपये करा पेट्रोल

आता भाजप नेते आणि राज्यसभा खासदार सुब्रह्मण्यम स्वामी(subrahmanyam swami) यांनीदेखील सरकारला घरचा आहेर दिला आहे. पेट्रोलचे दर ९० रुपये प्रतिलीटर असणे हे देशातील लोकांची पिळवणूक आहे. पेट्रोलची(petrol) एक्स-रिफायनरी किंमत ३० रुपये प्रतिलीटर आहे. सर्व कर आणि पेट्रोल पंप कमिशन मिळून ही किंमत ६० रुपयांनी वाढते आहे. यामुळे पेट्रोल ४० रुपये प्रतिलीटर दराने विकले जावे, अशी मागणी स्वामी यांनी केली आहे.

दिल्ली: देशात पेट्रोल-डिझेलचे दर(petrol -diesel prize hike) गगनाला भिडले आहेत. गेल्या काही दिवसांपासून देशातील विविध शहरात पेट्रोलचे दर प्रतिलीटर ९० रुपयांपेक्षा जास्त आहेत. यामुळे जनतेला कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. दरम्यान, वाढत्या इंधन दरामुळे नागरिकांकडून रोष व्यक्त केला जात आहे. अशातच, आता भाजप नेते आणि राज्यसभा खासदार सुब्रह्मण्यम स्वामी(subrahmanyam swami) यांनीदेखील सरकारला घरचा आहेर दिला आहे. पेट्रोलचे दर ९० रुपये प्रतिलीटर असणे हे देशातील लोकांची पिळवणूक आहे. पेट्रोलची एक्स-रिफायनरी किंमत ३० रुपये प्रतिलीटर आहे. सर्व कर आणि पेट्रोल पंप कमिशन मिळून ही किंमत ६० रुपयांनी वाढते आहे. यामुळे पेट्रोल ४० रुपये प्रतिलीटर दराने विकले जावे, अशी मागणी स्वामी यांनी केली आहे.

स्वामींच्या या गणितामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. सोशल मीडियावर याबाबत विविध प्रतिक्रिया नोंदविल्या जात आहे. काहींनी त्यांनाच इंधनाच्या किंमतीचे गणित समजावून सांगितले आहे.

दरम्यान, पेट्रोलियम निर्यातक देशांच्या संघटनेने अलीकडेच कच्च्या तेलाचे उत्पादन वाढवण्याचा निर्णय घेतल्यामुळे इंधनाचे दर स्थीर होतील, असा अंदाज पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी रविवारी वर्तवला होता. याचबरोबर, ओपेकने दोन दिवस आधीच कच्च्या तेलाचे उत्पादन दररोज पाच लाख बॅरलने वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. याचा आपल्याला फायदा मिळेल आणि इंधनाचे दर स्थीर होतील, असा आमचा अंदाज आहे. जेव्हा आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती वाढतात तेव्हा भारतातदेखील इंधनाचे दर वाढतात, असेही प्रधान यांनी सांगितले होते.