कधीकाळी पायात घालायला नव्हती चप्पल, त्याच व्यक्तीने आज उभी केलीये कोट्यावधींची कंपनी

अरोकिस्वामींनी लोकांच्या भल्यासाठी आपली कंपनी सुरू केली. त्यांना ठाऊक होते की, भारतातील बहुतेक लोकं गरीब आहेत. म्हणूनच त्यांनी टेस्टस् सुविधा लोकांना कमीत कमी खर्चात उपलब्ध व्हावी म्हणून या कंपनीची स्थापना केली. त्यांनी सांगितले की, सुरुवातीच्या दिवसात दररोज फक्त दोन नमुने टेस्टसाठी येत असत.

  आयुष्य नेहमीच गुलाबांसारखे नसते, त्यामागे काट्यांनी भरलेला प्रवास असतो जो फक्त खोल डोळ्यांना दिसतो. असे बरेच लोक आहेत ज्यांनी मेहनतीने आपले भाग्य लिहिले आणि दाखवून दिले की, जो माणूस मेहनतीने काम करतो तो एक दिवस नक्कीच यशस्वी होतो. एकेकाळी दोन दिवस भाकरीसाठी संघर्ष करणाऱ्या कोयंबटूरच्या शेतकऱ्याचा मुलगा आता जगातील सर्वात मोठ्या थायरॉईड चाचणी कंपनीचा मालक आहे.

  त्यांचे नाव काय?

  Arokiaswamy Velumani यांचा जन्म एका गरीब कुटुंबात झाला. त्यांचे वडील गरीब शेतकरी होते, त्यांच्याकडे जमीन नव्हती. गरिबीमुळे त्यांचे वडील त्यांना लहानपणी कपडे आणि चपलाही देऊ शकत नव्हते. अरोकिस्वामी वेलुमानी यांनी बालपणात अनेक अडचणींना तोंड दिले होते. आज ते थायरॉइड चाचण्या करणारी जगातील सर्वात मोठी कंपनी थायरोकेअर टेक्नॉलॉजीज लिमिटेडचे ​​मालक आहेत.

  आज त्यांच्या व्यवसायाचा विस्तार अनेक देशांमध्ये आहे

  थायरॉईड व्यतिरिक्त, त्यांची कंपनी रक्ताद्वारे इतर चाचण्या देखील करते. या कंपनीचे जगभरात १,१२२ आउटलेट आहेत. थायरोकेअरच्या भारतासोबतच तसेच नेपाळ, बांगलादेश आणि मध्य पूर्वेच्या देशांमध्ये अनेक आउटलेट आहेत.

  छोटं गाव मोठी स्वप्ने

  त्याची आई लहानपणी आठवड्याला ५० रुपये कमवायची. या किंमतीत ती म्हशीचे दूध विकायची आणि तिच्या मुलांना शिक्षण देण्यासाठी त्यात भर घालत असे. कित्येक वर्षांपासून आईने घरखर्च उभा केला. त्यांनी आपले शालेय शिक्षण गावातून पूर्ण केले आहे. यानंतर, ते पदवी घेण्यासाठी शहरात आले. त्यांनी आपले सर्व शिक्षण सरकारी शाळा आणि महाविद्यालयातून पूर्ण केले आहे.

  त्यांचा पगार होता १५० रुपये

  वयाच्या १९ व्या वर्षी त्यांनी B.Sc पूर्ण केले. त्यानंतर कोयंबटूरमध्ये एका छोट्या फार्मा कंपनीत काम करण्यास सुरुवात केली. इथे त्याचा पगार १५० होता. पगार खूपच कमी होता पण तरीही ते १०० रुपये घरी आईला पाठवायचे आणि कसा तरी ५० रुपयांत स्वतःचा खर्च भागवायचे. नशीबही जणू त्याची परीक्षाच पहात होतं. काही काळानंतर ती कंपनीच बंद झाली. ते बेरोजगार झाले.

  भाभा ॲटोमिक रिसर्च सेंटरमध्ये झाले दाखल

  असं म्हणतात की, जे काही होते ते चांगल्यासाठी होते. कंपनी बंद झाल्यानंतर त्यांनी भाभा ॲटोमिक रिसर्च सेंटरमध्ये प्रयोगशाळा सहाय्यक म्हणून अर्ज केला. यात त्यांची निवड झाली. भाभामध्ये काम करत असताना त्यांनी पुढील शिक्षण पूर्ण केले. पुढे ते शास्त्रज्ञ झाले.

  १४ वर्षांनंतर सुरू केली स्वतःची कंपनी

  १४ वर्षे भाभामध्ये काम केल्यानंतर अरोकिस्वामींनी स्वतःची कंपनी उघडण्याचा विचार केला. त्यांचे लग्न बँक कर्मचारी असलेल्या सुमती वेलुमनींशी झाले होते. जेव्हा त्यांनी कंपनी सुरू केली तेव्हा त्यांची पत्नी हीच पहिली कर्मचारी होती. त्यांच्या पत्नीने कंपनीसाठी स्वत:च्या नोकरीवर तुळशीपत्र ठेवले. पहिली प्रयोगशाळा मुंबईत उघडण्यात आली. आम्ही तुम्हाला सांगू की, त्यांनी ही कंपनी त्यांच्या १ लाख रुपयांच्या पीएफने सुरू केली होती.

  जेणेकरून प्रत्येकाला टेस्टस् करणं सोपं व्हावं

  अरोकिस्वामींनी लोकांच्या भल्यासाठी आपली कंपनी सुरू केली. त्यांना ठाऊक होते की, भारतातील बहुतेक लोकं गरीब आहेत. म्हणूनच त्यांनी टेस्टस् सुविधा लोकांना कमीत कमी खर्चात उपलब्ध व्हावी म्हणून या कंपनीची स्थापना केली. त्यांनी सांगितले की, सुरुवातीच्या दिवसात दररोज फक्त दोन नमुने टेस्टसाठी येत असत. यासाठी त्यांनी रात्रंदिवस मेहनत केली. हळूहळू त्यांनी आपले बिझनेस मॉडेल इतरांपेक्षा वेगळे केले. यामुळे टेस्टचा खर्च कमी झाल्याने जास्त लोकं त्यांच्याकडे येऊ लागली. याचा अरोकिस्वामींना खूप फायदा झाला.

  सर्वात स्वस्तात होतात टेस्ट

  वर्ष २०२० मध्ये त्यांच्या कंपनीचा महसूल ४७४ कोटी रुपये होता. ५१ टक्के नफ्यात वाढ झाली. फोर्ब्स इंडियाच्या मते, त्यांची कंपनी संपूर्ण जगातील सर्वात स्वस्त आरोग्य सुविधा पुरवते. जेव्हा लोकांना फक्त आयुष्य आरामात जगायचे असते तेव्हा अरोकिस्वामींनी आयुष्याच्या या टप्प्यात आव्हान कसे स्वीकारले? त्यांनी त्यांच्या पीएफच्या पैशांची गुंतवणूक करून कंपनी उघडली. त्यांची ही सत्य कथा तरुणाईसाठी एखाद्या प्रेरणेपेक्षा कमी नाही. बऱ्याच वेळा जीवनात कोणतीही गोष्ट जोखमीशिवाय साध्य होत नाही.