हा फोटो विचलित करू शकतो पण घटनेची दाहकता दाखवण्यासाठी लावण्यात आला आहे.
हा फोटो विचलित करू शकतो पण घटनेची दाहकता दाखवण्यासाठी लावण्यात आला आहे.

बांसवाडा जिल्ह्यातील नोगामामध्ये गुरुवारी सकाळी एक धक्कादायक घटना घडली.अशी वेळ कोणावरही येऊ नये अशी ही घटना होती. स्कूटीवरून शाळेत जात असलेल्या एका शिक्षिकेवर ११ KV विजेची तार पडली. या दुर्घटनेत त्या महिलेचा स्टूटीसह जळून कोळसा झाला.

घटना स्थळावरील लोकांनी सांगितले की, ही दुर्घटना गुरुवारी सकाळी १० वाजता घडली. मृत्यू झालेली महिला शिक्षिका नीलम पाटीदार नदीजवळून जात होती. यावेळी अचानक त्यांच्यावर विजेची तार पडली. घटनेच्या काही वेळापूर्वीच पाऊस पडला होता आणि यामुळे संपूर्ण रस्ता ओला होता. विजेची तार पडताच स्कूटीला आणि महिलेच्या अंगाला आग लागली.

तेथे उपस्थित असलेल्या नागरिकांनी प्रशासनाला याबाबत माहिती दिली असता ढिम्म प्रशासनाने घटनेनंतर तब्बल २० मिनिटांनी वीजपुरवठा खंडित केला. यावेळी आपल्यालाही करंट लागेल, या भीतीने कोणीच महिलेच्या जवळ गेले नाही. या दुर्दैवी घटनेत महिलेचा कोळसा झाला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेहाला पोस्टमॉर्टेमसाठी पाठवले.