भारतीय लष्कराला निकृष्ट शस्त्रांचा पुरवठा ; तब्बल ९६० कोटी रुपयांचे नुकसान

२०१४ ते २०२० दरम्यान ऑर्डिनन्स फॅक्टरी बोर्डाने खराब दर्जाचा दारूगोळा पुरवला. त्यामुळे ९६० कोटी रुपयांचे नुकसान ( Loss of Rs 960 crore ) झाले. ९६० कोटी म्हणजे एवढ्या पैशांमध्ये १५५ एमएम रेंजच्या मध्यम पल्ल्याच्या १०० तोफा खरेदी करता आल्या असत्या, असे अहवालात म्हटले आहे.

नवी दिल्ली : गेल्या सहा वर्षांत (Last six years) सरकारची मालकी असलेल्या ऑर्डिनन्स फॅक्टरी बोर्डाकडून (Ordinance Factory Board)  खराब दर्जाचा दारूगोळा (weapons ) विकत घेण्यावर भारतीय लष्कराचा पैसा मोठ्या प्रमाणावर खर्च झाला. या पैशांतून मध्यम पल्ल्याच्या १०० तोफा (Canon) खरेदी करता आल्या असत्या, असा दावा संरक्षण मंत्रालयाला पाठविण्यात आलेल्या अंतर्गत अहवालात केला गेला आहे.

भारतीय लष्करासाठी ( Indian Army) दारूगोळा आणि शस्त्रास्त्र निर्मितीचे काम या कारखान्यांत चालते. २३ एमएम एअर डिफेन्स शेल, आर्टिलरी शेल्स, १२५ एमएम टँक राऊंड आणि रायफल्समध्ये वापरण्यात येणाऱ्या विविध प्रकारच्या गोळ्यांमध्ये त्रुटी आढळल्या आहेत. २०१४ ते २०२० दरम्यान ऑर्डिनन्स फॅक्टरी बोर्डाने खराब दर्जाचा दारूगोळा पुरवला. त्यामुळे ९६० कोटी रुपयांचे नुकसान ( Loss of Rs 960 crore ) झाले. ९६० कोटी म्हणजे एवढ्या पैशांमध्ये १५५ एमएम रेंजच्या मध्यम पल्ल्याच्या १०० तोफा खरेदी करता आल्या असत्या, असे हा अहवाल म्हणतो.

अहवालात काय म्हटले आहे ?

ऑर्डिनन्स फॅक्ट्रीने केलेल्या या खराब दर्जाच्या उत्पादनामुळे फक्त आर्थिक नुकसानच झाले नाही, तर दारूगोळ्याच्या सुमार दर्जामुळे जे अपघात झाले, त्यात जीवितहानीही झाल्याचे अहवालात नमूद आहे. कोणावर जबाबदारी निश्चित करता येत नाही आणि खराब दर्जामुळे वारंवार अपघात घडतात. यामुळे सैनिक जखमी होतात, त्यांचा मृत्यू होतो. सरासरी दर आठवड्याला एक अपघात होत, असेही अहवालात म्हटले आहे.