सर्वोच्च न्यायालयाकडून दोन दिवस जैन मंदिरं उघडण्यास परवानगी

२२ आणि २३ ऑगस्टला जैन मंदिरं उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाकडून जैन भाविकांना मोठा दिलासा मिळाला आहे. परंतु एकाच वेळी पाच जणांनाच मंदिरात जाण्यास सर्वोच्च न्यायालयाकडून परवानगी देण्यात आली आहे.

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून सण-उत्सव साधेपणाने साजरे करण्याचं आवाहन केलं जात आहे. जैन धर्मियांच्या पर्युषण पर्वालाही सुरूवात झाली असून, मंदिरं उघडणार की नाही, अशी चर्चा सुरू होती. परंतु २२ आणि २३ ऑगस्टला जैन मंदिरं उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाकडून जैन भाविकांना मोठा दिलासा मिळाला आहे. परंतु एकाच वेळी पाच जणांनाच मंदिरात जाण्यास सर्वोच्च न्यायालयाकडून परवानगी देण्यात आली आहे.

जैन बांधवाच्या पर्युषण पर्वाला सुरूवात झाली असून, या काळात मुंबईतील जैन मंदिर खुली करण्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आणि समूह संसर्ग होण्याचा जास्त धोका असल्यामुळे राज्य सरकारकडून हाय कोर्टात मंदिरं बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र सर्वोच्च न्यायालयाने मुंबईतील दादर, भायखळा आणि चेंबूर येथील जैन मंदिरं प्रार्थनेसाठी खुली करण्यास परवानगी दिली आहे.

सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या अध्यक्षतेखालील खंठपीठाने हा निर्णय दिला आहे. राज्य सरकार आर्थिक गुंतवणूक असलेल्या प्रत्येक कामांना परवानगी देत आहे, पण मंदिरांचा प्रश्न येताच कोविडचा धोका असल्याचे सांगितले जाते, अशा शब्दांत सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी नाराजी व्यक्त केली आहे.