दिल्ली : सुदर्शन टीव्हीशी संबंधित एका प्रकरणाच्या व्हीडिओ कॉन्फरन्सिंग सुनावणीदरम्यान शर्ट न घालता कॅमेऱ्यासमोर बसलेल्या वकीलाला सर्वोच्च न्यायालयाने खडेबोल सुनावत तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. यापूर्वीही ऑनलाईन सुनावणीदरम्यान एक ज्येष्ठ वकील स्मोकिंग करताना दिसले होते, तर एक वकील बनियानवरच सुनावणीत सहभागी झाले होते.

दिल्ली : सुदर्शन टीव्हीशी संबंधित एका प्रकरणाच्या व्हीडिओ कॉन्फरन्सिंग सुनावणीदरम्यान शर्ट न घालता कॅमेऱ्यासमोर बसलेल्या वकीलाला सर्वोच्च न्यायालयाने खडेबोल सुनावत तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. यापूर्वीही ऑनलाईन सुनावणीदरम्यान एक ज्येष्ठ वकील स्मोकिंग करताना दिसले होते, तर एक वकील बनियानवरच सुनावणीत सहभागी झाले होते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, खंडपीठाचे नेतृत्त्व करत असलेले सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांनी सुनावणीदरम्यान न्यायमूर्ती कोण होते असा सवाल केला. त्यावर कोणीच उत्तर दिले नाही. न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी अशा वर्तनावर आक्षेप घेतल्याचे सांगण्यात येत आहे. खंडपीठाच्या सदस्य इंदू मल्होत्रा यांनीही नाराजी व्यक्त करत हे काम माफी योग्य नसल्याचे म्हटले.

सध्या सर्वोच्च न्यायालयासह इतर न्यायालयांमध्येही ऑनलाईन सुनावणी होत आहे. एखाद्या वकिलाने शिष्टाचाराचे उल्लंघन केल्याचे हे पहिलेच प्रकरण नाही. यापूर्वी राजीव धवन नावाचे एक ज्येष्ठ विधिज्ञ एका ऑनलाईन सुनावणीदरम्यान स्मोकिंग करताना दिसले होते. राजस्थान उच्च न्यायालयात जामीन अर्जावरील सुनावणीदरम्यान एक वकील बनियान घालून सहभागी झाले होते. त्यावेळीही न्यायाधीशांनी नाराजी व्यक्त केली होती. कोरोनामुळे न्यायालयाचे कामकाज व्हीडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे सुरू आहे. वकिलांनी योग्य पेहरावात यात सहभागी व्हावे. याचिकाकर्त्यांचे वकील योग्य पेहरावात नसल्यामुळे सुनावणी स्थगित केली जात आहे, असे म्हणत न्यायालयाने वकिलांना फटकारले होते.