सीबीएसई बोर्डाच्या १२वीच्या परीक्षांबाबत सोमवारी सुप्रीम कोर्टात सुनावणी

सध्याची स्थिती परीक्षेसाठी योग्य नाही. परीक्षा पुढे ढकलल्यास निकालास उशीर होईल. याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या पुढील अभ्यासावर होईल. त्यामुळे परीक्षा रद्द करावी. विद्यार्थ्यांना कशा प्रकारे गुण देता येतील यावर लवकर विचार करण्यात यावा, जेणेकरून निकाल लवकरात लवकर जाहीर करता येणार आहे असे सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आलेल्या याचिकेत म्हटले आहे.

    केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई) आणि भारतीय माध्यमिक शिक्षण प्रमाणपत्र (आयसीएसई) मंडळाच्या १२वीच्या परीक्षा रद्द करण्याच्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. याचिकेत परीक्षा पुढे ढकलण्याऐवजी थेट रद्द करण्याची मागणी करण्यात आली करण्यात आली होती. सर्वोच्च न्यायालयाने या याचिकेवरील सुनावणी सोमवारी घेणार असल्याचे सांगितले आहे.

    सध्याची स्थिती परीक्षेसाठी योग्य नाही. परीक्षा पुढे ढकलल्यास निकालास उशीर होईल. याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या पुढील अभ्यासावर होईल. त्यामुळे परीक्षा रद्द करावी. विद्यार्थ्यांना कशा प्रकारे गुण देता येतील यावर लवकर विचार करण्यात यावा, जेणेकरून निकाल लवकरात लवकर जाहीर करता येणार आहे असे सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आलेल्या याचिकेत म्हटले आहे.

    या संदर्भात न्यायमूर्ती ए.एम. खानविलकर आणि न्यायमूर्ती दिनेश माहेश्वरी यांच्या खंडपीठापुठे शुक्रवारी सुनावणी झाली. यावेळी न्यायमूर्तींनी याचिकाकर्त्या ममता शर्मा यांना या याचिकेची प्रत यापूर्वी सीबीएसई आणि आयसीएसईच्या वकिलांना दिली आहे का? असा सवाल केला. त्यावर शर्मा यांनी आज वकिलांना आगाऊ प्रत पाठवतील असे सांगितले.