Supreme Court

नीट(neet) आणि जेईई(jee) मुख्य परीक्षा पुढे ढकलण्यासाठी ६ राज्यांच्या मंत्र्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात पुनर्विचार याचिका दाखल केली होती. त्यावर आज सुनावणी झाली. सर्वोच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली आहे.

परीक्षेच्या काळात विद्यार्थांना येत असलेल्या समस्यांकडे दुर्लक्ष झाले आहे, असे ६ राज्यांच्या मंत्र्यांनी दाखल केलेल्या याचिकेत सांगण्यात आले होते. न्यायमूर्ती अशोक भूषण,न्यायमूर्ती गवई आणि न्यायमूर्ती मुरारी यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी करण्यात आली. एनटीए या परीक्षांचे आयोजन करते. जेईई मुख्य परीक्षा १ ते ६ सप्टेंबर या काळात तर नीट परीक्षा १३ सप्टेंबरला होणार आहे.

महाराष्ट्राचे मंत्री उदय सामंत ,पश्चिम बंगालचे मंत्री मलय घटक, राजस्थानचे मंत्री रघु शर्मा, झारखंडचे मंत्री रामेश्वर ओरांव, छत्तीसगढचे मंत्री अमरजीत भगत, पंजाबचे मंत्री केबीएस सिद्धू यांनी ही याचिका दाखल केली होती.