swiggy delivery boy

सोशल मीडियावर शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देणारे आणि विरोध करणारे असे दोन गट आहेत. अशाच एका संवादाच्या ट्विटवर फूड डिलेव्हरी अ‍ॅप असणाऱ्या ‘स्विगी’ने(swiggy answer) दिलेलं उत्तर खूप गाजत आहे.

नव्या कृषी विधेयकाबाबत(agricultural bill) आज पाचव्या दिवशीही शेतकऱ्यांचे आंदोलन सुरुच आहे.  शेतकऱ्यांच्या या आंदोलनामुळे सोशल मीडियावर  अनेक चर्चा होत आहेत.  सोशल मीडियावर शेतकरी आंदोलनाला(farmers protest) पाठिंबा देणारे आणि विरोध करणारे असे दोन गट आहेत. अशाच एका संवादाच्या ट्विटवर फूड डिलेव्हरी अ‍ॅप असणाऱ्या ‘स्विगी’ने(swiggy answer) दिलेलं उत्तर खूप गाजत आहे.

क्रिपिएस्ट माईण्ड नावाच्या ट्विटर हॅण्डलवरुन शेतकरी आंदोलनासंदर्भात एक ट्विट करण्यात आलं. यामध्ये ट्विट करणाऱ्या सोशल इन्फ्ल्युएन्सरने, शेतकरी आंदोलनासंदर्भात भक्त असणाऱ्या माझ्या एका मित्रासोबत चर्चा केली. त्याने मला आपण अन्नपदार्थांसाठी शेतकऱ्यांवर अवलंबून नाही. आपण कधीही हवं ते अन्नपदार्थ स्विगीवरुन मागवू शकतो असं म्हटलं. तु जिंकला म्हणून मी विषय सोडून दिला, असे म्हटले. यावर स्विगीने खूप भन्नाट उत्तर दिले आहे. अन्नासाठी आपण शेतकऱ्यांवर नाही तर स्विगीवर अवलंबून राहू शकतो असं म्हणणाऱ्या व्यक्तीच्या शिक्षणावरील खर्च वाया गेल्याचा टोला स्विगीने लगावला आहे.