Had his wife not been shown the Taj Mahal, he would be alive today

ताजमहालला भेट देण्यासाठी भारत सरकारच्या पर्यटन खात्याकडून शुल्क आकारण्यात येतं. देशातील आणि विदेशातील नागरिकांसाठी हे शुल्क वेगवेगळं असतं. भारतीयांना ताजमहाल पाहायला असेल, तर एका व्यक्तीला २५० रुपये मोजावे लागतात, तर परदेशी व्यक्तीला १३०० रुपये मोजावे लागतात. या शुल्कात आता वाढ करण्यात आलीय. त्यामुळे यापुढे भारतीय आणि परदेशी अशा दोन्ही पर्यटकांच्या खिसावरचा भार वाढणा आहे. 

    जगातील आठवं आश्चर्य आणि भारतीयांचा अभिमान असणाऱ्या ताजमहालला भेट देण्यासाठी वर्षभरात देशविदेशातून लाखो पर्यटक हजेरी लावत असतात. आयुष्यात एकदा तरी ताजमहाल पाहावा, असं अनेकांचं स्वप्न असतं. ते पूर्ण करण्यासाठी भारताच्या कानाकोपऱ्यातूनच नव्हे, तर जगभरातून पर्यटक आग्र्याला हजेरी लावत असतात.

    ताजमहालला भेट देण्यासाठी भारत सरकारच्या पर्यटन खात्याकडून शुल्क आकारण्यात येतं. देशातील आणि विदेशातील नागरिकांसाठी हे शुल्क वेगवेगळं असतं. भारतीयांना ताजमहाल पाहायला असेल, तर एका व्यक्तीला २५० रुपये मोजावे लागतात, तर परदेशी व्यक्तीला १३०० रुपये मोजावे लागतात. या शुल्कात आता वाढ करण्यात आलीय. त्यामुळे यापुढे भारतीय आणि परदेशी अशा दोन्ही पर्यटकांच्या खिसावरचा भार वाढणा आहे.

    यापुढे ताजमहालला भेट द्यायची असेल, तर भारतीय पर्यटकांना अधिक पैसे मोजावे लागणार आहे. त्यासाठी दोन टप्प्यांत तिकीटांचं नियोजन करण्यात आलंय. मुख्य प्रवेशद्वारातून आत येण्यासाठी आता २०० रुपये आकारले जातील, तर मुख्य डोममध्ये जाण्यासाठी वेगळे २०० रुपये आकारण्यात येतील. त्यामुळे एकूण ४०० रुपये पर्यटकांना मोजावे लागणार आहेत.

    ऐतिहासिक महत्त्व असलेल्या वास्तूंचं जतन करण्यासाठी, त्याची निगा राखण्यासाठी आणि पर्यटकांना अधिकाधिक सोयीसुविधा पुरवण्यासाठी पुरातत्व विभागाकडून आणि पर्यटन विभागाकडून वेगवेगळ्या ठिकाणी प्रवेश शुल्क आकारलं जातं. त्यामुळे त्या जागेची निगा राखण्यापासून इतर अनेक कामांना मदत होत असते.