आता या तारखेपासून पाहता येणार ताजमहाल

ताजमहाल आणि आग्रा किल्ला हे पर्यटकांसाठीचे खास आकर्षण आहे. लॉकडाऊनच्या काळात सगळ्या पर्यटन स्थळांप्रमाणे ही ठिकाणेदेखील बंद होती. मात्र आता २१ सप्टेंबरपासून ताजमहाल आणि आग्रा किल्ला लोकांसाठी खुला करण्यात येणार आहे. ताजमहाल पाहण्यासाठी येणाऱ्यांची संख्या ५ हजार असेल. तसेच आग्रा किल्ला पाहायला २५०० लोक येऊ शकतात. यासाठी ऑनलाईन तिकीट बुकींग करता येईल असे पुरातत्व विभागाचे अधीक्षक बसंत कुमार यांनी सांगितले आहे.