The Taliban took control of the Presidential Palace in Afghanistan; Mulla Hibatullah Akhundzada new leader

अफगाणिस्तानातील चिघळत असलेल्या परिस्थितीवरून अमेरिकन परराष्ट्रमंत्री अँटनी ब्लिंकन यांनी भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्यासोबत चर्चा केली. ब्रिटन, रशिया, चीनसह भारताने अफगाणिस्तानवर अमाप खर्च केला असून अनेक प्रकल्प अपूर्ण असल्याकडे लक्ष वेधले. दुसरीकडे, अफगाणिस्तानचा ताबा घेतलेल्या तालिबानने भारताने देशातील अपूर्ण प्रकल्प पूर्ण करावे अशी ऑफर दिली आहे. भारताने अफगाणिस्तानात तीन अब्ज डॉलरच्या विकास योजनांमध्ये गुंतवणूक केली आहे.

  दिल्ली : अफगाणिस्तानातील चिघळत असलेल्या परिस्थितीवरून अमेरिकन परराष्ट्रमंत्री अँटनी ब्लिंकन यांनी भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्यासोबत चर्चा केली. ब्रिटन, रशिया, चीनसह भारताने अफगाणिस्तानवर अमाप खर्च केला असून अनेक प्रकल्प अपूर्ण असल्याकडे लक्ष वेधले. दुसरीकडे, अफगाणिस्तानचा ताबा घेतलेल्या तालिबानने भारताने देशातील अपूर्ण प्रकल्प पूर्ण करावे अशी ऑफर दिली आहे. भारताने अफगाणिस्तानात तीन अब्ज डॉलरच्या विकास योजनांमध्ये गुंतवणूक केली आहे.

  भारतीय नागरिक देशात पोहोचले

  काबूलमध्ये अडकलेल्या नागरिकांना घेऊन भारतीय वायुदलाचे सी-17 हे विमान मंगळवारी दुपारी गुजरातमधील जामनगर येथे पोहोचले. या विमानाद्वारे राजदुतांसह 120 भारतीय नागरिक देशात सुखरूप पोहोचले. यामध्ये दुतावासाचे अधिकारी, कर्मचारी आटीबीपीचे जवान आणि काही माध्यमांचे प्रतिनिधी यांचा समावेश आहे. या सर्वांना सायंकाळी हिंडन विमानतळावर उतरविण्यात आले.

  तालिबानींमध्ये दोन भारतीय

  काँग्रेसचे खासदार शशी थरुर यांनी अफगाणिस्तानमध्ये दहशत माजवणाऱ्या तालिबान्यांसंदर्भात एक खळबळजनक दावा केला आहे. थरुर यांनी म्हटलंय की, दहशत माजवणाऱ्या तालिबान्यांमध्ये दोन भारतीय देखील सामील आहेत. या दोन व्यक्ती मल्याळम भाषा बोलत आहेत असेदेखील त्यांनी ट्वीट केले.

  कोणत्याही देशाला अफगाणच्या जमिनीचा वापर करू देणार नाही. कोणताही देश आपल्या उद्देश्यपूर्तीसाठी आमच्या भूमीचा वापर करणार असतील तर त्यास आम्ही परवानगी देणार नाही. ही आमची क्लिअर कट पॉलिसी आहे. जर त्यांनी (भारत) अफगाणिस्तानात पायाभूत प्रकल्प उभारले आहेत ते अपूर्णावस्थेत आहे. ते त्यांनी पूर्ण करावे कारण ते नागरिकांसाठी आहेत.

  - सुहैल शाहीन, तालिबान प्रवक्ता