संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत अफगाणिस्तानविषयक ठराव मंजूर झाल्यावर भारताने उचलले ‘हे’ पाऊल, टास्क फोर्सचे काम सुरु

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत(United Nations Security Council) ठराव मंजूर(Resolution Passed By UNSC) करण्यात आला आहे. या ठरावामध्ये अफगाणिस्तानची जमीन इतर कोणत्याही देशाविरुद्धच्या कारवाईसाठी वापरू नये अशी मागणी करण्यात आली आहे. भारताने(India) हा ठराव मंजूर व्हावा म्हणून मध्यवर्ती भूमिका बजावली आहे.

    अफगाणिस्तानमध्ये(Afghanistan) तालिबानने कब्जा केल्यावर संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत(United Nations Security Council) ठराव मंजूर(Resolution Passed By UNSC) करण्यात आला आहे. या ठरावामध्ये अफगाणिस्तानची जमीन इतर कोणत्याही देशाविरुद्धच्या कारवाईसाठी वापरू नये अशी मागणी करण्यात आली आहे. भारताने(India) हा ठराव मंजूर व्हावा म्हणून मध्यवर्ती भूमिका बजावली आहे. ५ स्थायी आणि १० अस्थायी सदस्य असलेल्या संघटनेने हा ठराव मंजूर केला आहे. तालिबानने त्यांच्या आश्वासनांची पूर्तता केली पाहिजे आणि अफगाणिस्तानची जमीन कोणत्याही देशाविरुद्ध वापरली जाणार नाही याची खात्री करायला हवे असे संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने म्हटले आहे.

    त्यानंतर आता अफगाणिस्तानमधील बदलती परिस्थिती पाहता भारताच्या प्राधान्यांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परराष्ट्र मंत्री एस जयशंकर, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची एक टास्क फोर्स तयार केली आहे. अफगाणिस्तानमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्याला भारत प्राधान्य देत आहे. त्यासाठी खास पॅनेल गेल्या काही दिवसांपासून बैठक घेत आहे. ह अडकलेल्या भारतीयांच्या सुरक्षित आणणे, अफगाण नागरिकांचा (विशेषत: अल्पसंख्यांक) भारतात प्रवास यासाठी प्रयत्न करत आहे. तसेच भविष्यात अफगाणिस्तानची जमीन भारताच्या विरोधात वापरली जाणार नाही याची खात्री करणे ही प्राथमिकता आहे. सरकार काबूलमधील घडामोडींची लक्ष ठेऊन आहे. तर मंगळवारी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने मंजूर केलेल्या ठरावासह आंतरराष्ट्रीय प्रतिक्रियांचे निरीक्षण करत आहे.