Tata Steel ने वाढवला ऑक्सिजन पुरवठा , आता दररोज ‘इतका’ ऑक्सिजन उपलब्ध होणार

कोरोना संक्रमणाचा परिणाम झालेल्या राज्यांना ऑक्सिजन पुरवठा (Oxygen Supply) केला जात आहे. आता टाटा स्टीलने म्हटले आहे की, कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी टाटा स्टील दररोजचा ऑक्सिजनचा पुरवठा वाढवून ६०० टन केला आहे.

    नवी दिल्ली:  दिल्लीसह अनेक राज्यात वैद्यकीय ऑक्सिजनची (Medical Oxygen) कमतरता आहे. अशा परिस्थितीत बर्‍याच कंपन्यांकडून कोरोना संक्रमणाचा परिणाम झालेल्या राज्यांना ऑक्सिजन पुरवठा (Oxygen Supply) केला जात आहे. आता टाटा स्टीलने म्हटले आहे की, कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी टाटा स्टील दररोजचा ऑक्सिजनचा पुरवठा वाढवून ६०० टन केला आहे.

    स्टील मंत्रालयाच्या सूचनेनुसार, देशातील स्टील प्लांट्स (Steel Plants) विविध राज्यांना वैद्यकीय ऑक्सिजनचा पुरवठा करीत आहेत. सध्या रुग्णालयांमध्ये रुग्णांच्या उपचारासाठी ऑक्सिजनची मोठी कमतरता आहे. ‘लोकांचे प्राण वाचवण्यासाठी केंद्रासोबत काम करत आहोत.

    टाटा स्टीलने एका ट्विटमध्ये म्हटले आहे की, कंपनीने दररोज लिक्विड मेडिकल ऑक्सिजनचा पुरवठा ५००-६०० टनापर्यंत वाढविला. ऑक्सिजनची उपलब्धता वाढवण्यासाठी आणि लोकांचे प्राण वाचवण्यासाठी आम्ही केंद्र सरकार आणि राज्यांबरोबर काम करत आहोत.