टीम इंडियाचा नीचांक स्कोअर; ३६ धावांतच अख्खा संघ गारद

अ‍ॅडलेड कसोटीच्या तिसऱ्या दिवशी टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाच्या वेगवान गोलंदाजांसमोर नांगी टाकली. टीम इंडियाने १५ धावांवर सलग चार विकेट गमावल्या. यानंतर, मोहम्मद शमी रिटायर्ड हर्ट होण्यापूर्वी संघाची धावसंख्या ३६/९ होती. भारताच्या कसोटी इतिहासातील हा सर्वात कमी स्कोअर आहे.

अ‍ॅडलेड: अ‍ॅडलेड कसोटीच्या तिसऱ्या दिवशी टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाच्या वेगवान गोलंदाजांसमोर नांगी टाकली. टीम इंडियाने १५ धावांवर सलग चार विकेट गमावल्या. यानंतर, मोहम्मद शमी रिटायर्ड हर्ट होण्यापूर्वी संघाची धावसंख्या ३६/९ होती. भारताच्या कसोटी इतिहासातील हा सर्वात कमी स्कोअर आहे. तत्पूर्वी, भारताने १९७४ मध्ये इंग्लंडविरुद्ध लॉर्ड्स येथे ४२ धावा केल्या होत्या, जो आतापर्यंतचा सर्वात कमी स्कोअर होता. इतिहासातील सर्वात कमी धावांवर ऑलआऊट झाल्याची लज्जास्पद नोंद न्यूझीलंडच्या नावावर आहे. यानंतर दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंडसुद्धा या लज्जास्पद विक्रमाचा भाग आहेत.

४६ वर्षांपूर्वीचा लाजीरवाणा विक्रम मोडला
भारताच्या या खराब फलंदाजीमुळे ४६ वर्षांपूर्वीचा लाजीरवाणा विक्रमही आज तुटला आहे. १९७४ मध्ये लॉर्ड्सवर इंग्लंडविरोधात झालेल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने ४२ धावांची निचांकी धावसंख्या उभारली होती. आता ४६ वर्षांनंतर भारताने हा लाजीरवाणा विक्रम मोडला आहे.

लॉर्ड्स कसोटीत काय घडलं होतं?
१९७४ मध्ये एकनाथ सोलकर (१८ नाबाद) वगळता एकाही भारतीय फलंदाजाला दुहेरी धावसंख्या ओलांडता आली नव्हती. सुनील गावसकर, फारुख इंजिनिअर, अजित वाडेकर, गुंडाप्पा विश्वनाथ आणि ब्रीजेश पटेल या धुरंधर फलंदाजांना दुहेरी धावसंख्याही ओलांडता आली नव्हती. इंग्लंडकडून ख्रिस ओल्डनं पाच विकेट घेतल्या होत्याल तर ज्योफ अर्नोल्ड याने ४ विकेट घेतल्या होत्या.

सर्वात लहान कसोटी संघाची धावसंख्या

कमी धावसंख्या         संघ विरोधी संघ                      वर्ष
२६                           न्यूझीलंड इंग्लंड                      १९५५
३०                           दक्षिण आफ्रिका इंग्लंड             १९८६
३०                           दक्षिण आफ्रिका इंग्लंड            १९२४
३५                           दक्षिण आफ्रिका इंग्लंड            १८९९
३६                           दक्षिण आफ्रिका` ऑस्ट्रेलिया  १९३२
३६                           ऑस्ट्रेलिया इंग्लंड                  १९०२
३६                           भारत ऑस्ट्रेलिया                   २०२०
३८                          आयर्लंड इंग्लंड                        २०१९
४२                          न्युझीलँड ऑस्ट्रेलिया              १९४६
४२                          ऑस्ट्रेलिया इंग्लंड                   १९८८