तो तिला पाठवायचा अश्लील फोटो ; वैतागून तिने उचललं टोकाचं पाऊल आणि…

मुलीने नकार देताच तो तिला संबंध संपविण्याची धमकी देत होता. मुलगी या संबंधांमुळे अधिक तणावाखाली वावरत होती आणि याची परिणती आत्महत्या करण्यात झाली असावी असा अंदाज असल्याचे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

    पश्चिम बंगाल : पश्चिम बंगालच्या जलपैगुडी जिल्ह्यात १४ वर्षाच्या मुलीने रागाच्या भरात आत्महत्या केली आहे. पोलिसांनी सोमवारी माहिती दिली की, घटना बानरहाट पोलीस ठाण्याच्या हद्दीत रविवारी घडली आहे. मुलीचे धुपगुरी येथील एका युवकासोबत प्रेमसंबंध होते आणि तो तिला अश्लील फोटो तसेच व्हिडिओ पाठवून तिच्यावर दबाव आणत होता.

    मुलीने नकार देताच तो तिला संबंध संपविण्याची धमकी देत होता. मुलगी या संबंधांमुळे अधिक तणावाखाली वावरत होती आणि याची परिणती आत्महत्या करण्यात झाली असावी असा अंदाज असल्याचे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

    मुलीच्या कुटुंबियांनी तक्रार दाखल केल्यानंतर तपास सुरू केला असल्याची माहिती त्यांनी दिली. आरोपी फरार झाला असून त्याला पकडण्याचे सर्वतोपरी प्रयत्न सुरू असल्याचेही या अधिकाऱ्याने सांगितले. मुलीच्या वडिलांनी या युवकाला मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी केली आहे.