telangana hyderabad municipal corporation election results trs aimim bjp
कोण होणार हैद्राबादचा नवा निजाम? भाजपची ८४ जागांवर आघाडी

अमित शाह यांनी २९ नोव्हेंबरला हैद्राबाद येथे रोड शो करण्यापूर्वी चार मिनार स्थित भाग्यलक्ष्मी मंदिरात पूजा केली होती. भाजप सरकार सत्तेत आल्यास हैद्राबादचे नाव बदलून भाग्यनगर करणार असल्याचे उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आश्वासन दिलं होतं.

हैद्राबाद महापालिकेच्या १५० जागांसाठी मतदान झालं असून मतमोजणी सुरू झाली आहे. उपलब्ध झालेल्या माहितीनुसार, भाजपची ८५ जागांवर आघाडी घेतली आहे.

अमित शाह यांनी २९ नोव्हेंबरला हैद्राबाद येथे रोड शो करण्यापूर्वी चार मिनार स्थित भाग्यलक्ष्मी मंदिरात पूजा केली होती. भाजप सरकार सत्तेत आल्यास हैद्राबादचे नाव बदलून भाग्यनगर करणार असल्याचे उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आश्वासन दिलं होतं.

भाजपला कर्नाटकाव्यतिरिक्त दक्षिणेतील अन्य राज्यातही पाय घट्ट रोवायचे आहे. हा परिसर मुस्लिम बहुल असला तरी तो हिंदी भाषिकांमध्ये मोडत नाही. आम्ही आपल्याला ग्रेटर हैद्राबाद महापालिकेच्या (GHMC) निवडणुकीविषयी सांगत आहोत. भाजप या ठिकाणी इतिहास रचण्याच्या बेतात आहे. आतापर्यंत २२ जागांवर भाजपने आघाडी घेतली आहे. गेल्या निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष असलेल्या तेलंगणा राष्ट्रवादी समिति (TRS) एकूण ५७ जागांवर आघाडीवर आहे.

हैद्राबाद हा आपला बालेकिल्ला असल्याचा दावा करणारा असदुद्दीन ओवैसी यांचा ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुसलमीन (AIMIM) एकूण १७ जागांवर आघाडीवर आहे. ओवैसी यांच्या पक्षाला गेल्या निवडणुकीत ४४ जागा मिळाल्या होत्या. काँग्रेसने २ जागांवर आघाडी घेतली आहे. गेल्यावेळीही त्यांना दोनच जागांवर समाधान मानावे लागले होते.

१३ वर्षांपूर्वी GHMCची स्थापना करण्यात आली होती

यावेळी १ डिसेंबरला मतदान झालं होतं. GHMC चे १५० वॉर्डात एकूण१,१२२ उमेदवार रिंगणात आहेत. यावेळची लढत ही चुरशीची होणार असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे कारण भाजपने या निवडणुकीत सर्व शक्ती पणाला लावलेली आहे. २००७ मध्येच GHMC शी स्थापना झाली होती.

आजवर GHMC च्या दोन निवडणुका झाल्या आहेत

२०१६ ला होती ही स्थिती

पक्ष  जागा
TRS 99
AIMIM 44
भाजपा 4
कांग्रेस 2
TDP 1
एकूण 150

२००९ ला होती ही स्थिती

पक्ष जागा
कांग्रेस 52
TDP 45
AIMIM 43
भाजपा 4
अन्य 5
एकूण 149

यावेळी शाह यांनीच मोर्चा सांभाळला

गृहमंत्री अमित शाह यांनी २९ नोव्हेंबरला हैद्राबादला भेट दिली होती. येथील चार मिनार स्थित भाग्यलक्ष्मी मंदिरात जाऊन त्यांनी पूजा केली आणि त्यांनतर सिकांदराबाद येथे रोड शो केला. यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन TRS सरकारवर तीव्र शब्दात ताशेरे ओढले.

ते म्हणाले, चंद्रशेखर राव (KCR) जींना मला विचारायचं आहे की, तुम्ही ओवैसीसोबत युती करणार असाल तर आम्हाला काहीच अडचण नाही. लोकशाहीत कोणालाही कोणत्याही पक्षाशी दोस्ती आणि युती करण्याचा अधिकार आहे. प्रश्न असा आहे की, तुम्ही एका बंद खोलीत बसून ईलू-ईलू करत जागा वाटून घेतल्या. जेव्हा मी कारवाई करतो, तेव्हा हे संसदेत हल्लाबोल करतात. त्यांनी मला असं लिहून द्यावं की, रोहिंग्या आणि बांग्लादेशी नागरिकांना भारतातून हद्दपार करा. असं ओवैसी अवैध रोहिंग्या मुस्लिमांबाबत विचारलेल्या प्रश्नाला अमित शाह यांनी उत्तर दिलं होतं.

यावेळीही ५० टक्केही मतदान झालं नाही

यावेळी GHMC निवडणुकीत ४६.५५ % मतदान झालं २००९ च्या ४२.०४% तर २०१६ च्या निवडणुकीत ४५.२९% मतदारांनीच मतदान केलं तथापि, गेल्या २ निवडणुकांच्या तुलनेत यावेळी अधिक मतदान झालं.

GHMC मध्ये आहेत २४ विधानसभा आणि ५ लोकसभेच्या जागा

GHMC देशातील सर्वात मोठ्या महापालिकांपैकी एक आहे. याचा विस्तार ४ जिल्ह्यांत आहे. यात हैद्राबाद, मेडचल-मलकाजगिरी, रंगारेड्डी आणि संगारेड्डी यांचा समावेश आहे. पूर्ण परिसरात २४ विधानसभेच्या जागा असून तेलंगणाच्या ५ जागांचा लोकसभेत समावेश होतो. म्हणूनच GHMC निवडणुकीत KCR पासून भाजप, काँग्रेस आणि ओवैसीपर्यंत सर्वांचीच प्रतिष्ठा पणाला लागली आहे.