The great performance of the Indian Army on the eve of Diwali; Surrender of the rebel leader in the wanted list

पूंछ-राजौरीच्या जंगलात दहशतवादी आणि लष्कराच्या जवानांमध्ये अजूनही चकमक सुरु आहे. या ऑपरेशनमुळे जम्मू-पूंछ-राजौरी हायवे बंद करण्यात आला आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याच दहशतवाद्यांसोबत चकमक सुरु आहे ज्यांनी १० ऑक्टोबरला सुरक्षा जवानांवर गोळीबार केला होता. या चकमकीत एक अधिकारी आणि चार जवान शहीद झाले होते.

    नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमधील पूंछ जिल्ह्यात सध्या तणावाची परिस्थिती आहे. येथे सुरु असलेल्या दहशतवाद्यांविरोधातील कारवाईदरम्यान लष्कर अधिकारी आणि जवान गंभीर जखमी झाले आहेत. चकमकीदरम्यान पाच जवान शहीद झाल्यानंतर चार दिवसांनी जवानांनी दहशतवाद्यांविरोधात कारवाईला सुरुवात केली असल्याची माहिती समोर येत आहे.

    पूंछ-राजौरीच्या जंगलात दहशतवादी आणि लष्कराच्या जवानांमध्ये अजूनही चकमक सुरु आहे. या ऑपरेशनमुळे जम्मू-पूंछ-राजौरी हायवे बंद करण्यात आला आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याच दहशतवाद्यांसोबत चकमक सुरु आहे ज्यांनी १० ऑक्टोबरला सुरक्षा जवानांवर गोळीबार केला होता. या चकमकीत एक अधिकारी आणि चार जवान शहीद झाले होते.लष्कर गेल्या चार दिवसांपासून या दहशतवाद्यांचा पाठलाग करत होते. मात्र उंच डोंगर आणि जंगलामुळे ते जवानांना चकमा देत होते. पण अखेर गुरुवारी जवान आणि दहशवतादी आमने-सामने आले. दरम्यान, अजूनही दहशवादी आणि जवान यांच्यात अद्यापही चकमक सुरु आहे.