लडाख सीमा रेषेवर तणाव कायम, पुन्हा होणार भारत-चीन ब्रिगेड कमांडर स्तरावर बैठक

चीननी बैठकीनंतरही पूर्व लडाखमधील वास्तविक नियंत्रण रेषेत (एलएसी) चुमर भागात घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. हा प्रयत्नही भारतीय जवानांनी अयशस्वी केला आहे. माहितीनुसार, चीनी सैन्य ७ ते ८ जड वाहनांसह एलएसीतून त्यांच्या चप्पूजी छावणीतून भारतीय प्रांताकडे प्रस्थान केले.

लडाख : चीनने लडाख सीमेवर घुसखोरी करण्याचा प्रयत्न केल्यामुळे पुन्हा एकदा तणावपूर्ण परिस्थीती निर्माण झाली आहे. त्यामुळे भारत-चीनची ब्रिगेड कमांडर स्तरीय बैठक ( India-China brigade commander level meeting) आज (दि. २ सप्टेंबर २०२०) ला १० वाजता चुशुल/मोल्दो येथे होणार आहे. या बैठकीमध्ये पँगोंग त्सोच्या काठावर चिनने केलेला मुद्दा केंद्रस्थानी असेल.

लडाखमध्ये पँगोंग त्सो तलावाच्या दक्षिण बाजूला चीनी सैन्याने घुसखोरी केली होती. यावेळीही भारतीय सैन्याने चोख प्रत्युत्तर देत चीनचा डाव हानून पाडला होता. या मुद्द्यावरही मंगळवारी चुशुल/मोल्दो येथे कमांडर स्तरीय बैठक पार पडली.

परंतु, चीननी बैठकीनंतरही पूर्व लडाखमधील वास्तविक नियंत्रण रेषेत (एलएसी) चुमर भागात घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. हा प्रयत्नही भारतीय जवानांनी अयशस्वी केला आहे. माहितीनुसार, चीनी सैन्य ७ ते ८ जड वाहनांसह एलएसीतून त्यांच्या चप्पूजी छावणीतून भारतीय प्रांताकडे प्रस्थान केले. प्रत्युत्तरात भारतीय सुरक्षा दलाने घुसखोरी रोखण्यासाठी ठोस उपाययोजना केल्या आहेत. त्यामुळे चीनचा डाव हानून पाडण्यात भारतीय सुरक्षा दलाला यश आले आहे.