काश्मीर खोऱ्यात पुन्हा दहशतीचे वातावरण, खोरे सोडून ५० परिवार जम्मूत पोहचले, सरकारी कर्मचारी कार्यालयात जाईनात

जम्मू- काश्मीर खोऱ्यात सातत्याने होत असलेल्या दहशतवादी हल्ल्यांमुळे जनतेत भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे या केंद्रशासित प्रदेशात राहत असलेले अल्पसंख्याक आणि काश्मिरी पंडित जम्मूला परतू लागले आहेत. तर अनेकांनी सरकारी कार्यालयात कामासाठी जाणे बंद केले आहे. दुसरीकडे घरातून बाहेर पडू नये, लवकरच परिस्थिती नियंत्रणात यील, असे आवाहन राज्य सरकारकडून करण्यात येते आहे.

  जम्मू- काश्मीर खोऱ्यात सातत्याने होत असलेल्या दहशतवादी हल्ल्यांमुळे जनतेत भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे या केंद्रशासित प्रदेशात राहत असलेले अल्पसंख्याक आणि काश्मिरी पंडित जम्मूला परतू लागले आहेत. तर अनेकांनी सरकारी कार्यालयात कामासाठी जाणे बंद केले आहे. दुसरीकडे घरातून बाहेर पडू नये, लवकरच परिस्थिती नियंत्रणात यील, असे आवाहन राज्य सरकारकडून करण्यात येते आहे.

  गेल्या आठवडाभरात दहशतवाद्यांनी २०हून अधिक अल्पसंख्याक परिवारातील सदस्यांची हत्या केली आहे. काही दिवसांपूर्वी दहसतवाद्यांनी एका शाळेवर हल्ला केला होता, त्यात एका काश्मिरी पंडीत शिक्षकाची आणि एका शिख मुखुयाध्यापिका महिलेची हत्या करण्यात आली होती. यामुले अल्पसंख्याकांमध्ये दहशतीचे वातावरण असून, त्यांनी खोऱ्यातून बाहेर पडणे पसंत केले आहे.

  ४० ते ५० परिवार जम्मूत दाखल

  एका काश्मिरी पंडिताने दिलेल्या माहितीनुसार, ४० ते ५० कुटुंब खोऱ्यातून जम्मूत दाखल झाले आहेत. जम्मूत पोहचलेल्या एका व्यक्तीने नाव न सांगण्याच्या अटीवर संगितले की गेले दशकभर आपण सरकारी शिबिरात राहतो आहे. २००३, २०१६ सालीही जेवढी दहशत वाटत नव्हती, तेवढी आत्ताच्या घडीला वाटत असल्याचं त्याने सांगितले.

  संवेदनशील परिसरात सुरक्षा वाढवली

  प्रशासन आणि पोलिसांच्या कठोर उपाययोजना सुरु असतानाही, दहशतवादी काश्मीरमध्ये सातत्याने घुसखोरी करीत आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर श्रीनगर आणि संवदेनशील परिसरातील सुरक्षेत मोठी वाढ करण्यात आली आहे. त्याचबरोबर जागोजागी नाकाबंदी करण्यात आली असून, तिथेही तपासणी करण्यात येते आहे. दुसरीकडे कुलगाव, बारामुल्ला, अनंतनाग परिसरात सुरक्षा दलांकडून छापेमारी आणि सच्र ऑपरेशन हती घेण्यात आले आहे. ठिकठिकाणी शोध घेत, दहशतवाद्यांना शोधून काढण्याचे जिकिरीचे काम सुरु आहे.

  काश्मीर न सोडण्याचं राजकीय पक्षांचं आवाहन

  स्थानिक राजकीय नेत्यांनी आणि पक्षांनी काश्मिरी पंडित आणि शिखांनी काश्मीर खोरे सोडू नये, असे आवाहन केले आहे. माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी एका पीडित परिवारांची भेट घेतली. यावेळी त्यांनी अल्पसंख्याकांचं रक्षण करु, असे सांगितले. दहशतवाद्यांचा दृष्ट हेतू कधीही सफल होऊ देणार नाही, असंही ते म्हणाले. त्यापूर्वी मेहबूबा मुफ्ती यांनीही एका पीडित परिवाराची भेट घेतली होती.तर गुपकार अलायन्स या परिस्थितीसाठी केंद्र सरकारला जबाबदार ठरवतंय. केंद्र सरकार अपयशी ठरल्याने हे सर्व घडत असल्याचा आरोप या पक्षाकडून करण्यात येतो आहे.