जम्मू-कश्मीरच्या बारामुल्ला भागात आतंकवादी हल्ला, ३ जवान शहीद

या हल्ल्यात सीआरपीएफचे दोन जवान आणि जम्मू-काश्मीर पोलिसांचे विशेष पोलिस अधिकारी (एसपीओ) शहीद झाले असल्याचे त्यांनी सांगितले. या अधिकाऱ्याने सांगितले की सुरक्षा दलाने या भागाला घेराव घालून दहशतवाद्यांना पकडण्यासाठी कारवाई सुरू केली आहे.

श्रीनगर : जम्मू-कश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यात सोमवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफ आणि पोलिसांचे तीन जवान शहीद झाले. एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, उत्तर काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यातील केरी भागात आज सकाळी अतिरेक्यांनी सुरक्षा दलाच्या पथकावर हल्ला केला.