army

मिनी सचिवालयातून पळ काढल्यानंतर दहशतवाद्यांनी आजूबाजूच्या परिसराचा लपण्यासाठी आसरा घेतला. त्यानंतर जादा फोर्स मागवत त्या संपूर्ण परिसरात सीआरपीएफच्या जवानांनी तपास अभियान सुरु केलं आहे. दरम्यान, अद्याप कोणत्याही दहशतवाद्याला ताब्यात घेतल्याची माहिती मिळाली नाही.

श्रीनगर : दक्षिण काश्मीरमधील मिनी सचिवालयाच्या (Mini Secretariat ) सुरक्षा अंतर्गत तैनात सीआरपीएफ जवानांच्या पथकावर दहशतवाद्यांनी हल्ला (Terrorist attack)  केला आहे. आतापर्यंत कोणत्याही जीवितहानीचे नुकसान झाले नाही. संपूर्ण परिसर रिकामा करण्यात आला आहे.


मिनी सचिवालयातून पळ काढल्यानंतर दहशतवाद्यांनी आजूबाजूच्या परिसराचा लपण्यासाठी आसरा घेतला. त्यानंतर जादा फोर्स मागवत त्या संपूर्ण परिसरात सीआरपीएफच्या जवानांनी तपास अभियान सुरु केलं आहे. दरम्यान, अद्याप कोणत्याही दहशतवाद्याला ताब्यात घेतल्याची माहिती मिळाली नाही. तसेच आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झाल्याचीही माहितीही मिळालेली नाही. गोळीबार झाल्यामुळे आजूबाजूच्या परिसरात दहशत पसरली आहे.