टेस्लाची भारतात एन्ट्री, देशातील इलेक्ट्रिकल कारच्या आवश्यकतेवर नितीन गडकरींनी केले भाष्य…

टेस्लाने अधिकृतरित्या भारतीय बाजारात प्रवेश केला आहे. टेस्लाने टेस्ला इंडिया मोटर्स अँड एनर्जी प्राइवेट लिमिटेड (Tesla India Motors and Energy Pvt Ltd with RoC Bangalore) या नावे रजिस्ट्रेशन केले असून भारतीय बाजारात लक्झरी इलेक्ट्रीक कारचे उत्पादन आणि विक्री करण्यात येणार आहे.

इलेक्ट्रीक वाहनांसाठी प्रयत्नशील असलेल्या केंद्र सरकारच्या योजनेला मोठा बूस्ट मिळाला आहे. टेस्ला बंगळुरुमध्ये रिसर्च अँड डेव्हलपमेंट युनिटद्वारे काम सुरु करणार आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री येडीयुराप्पा यांनी टेस्लाचे स्वागत केले. ८ जानेवारीला नोंदणी करण्यात आली आहे. वैभव तनेजा, वेंकटरंगम श्रीराम आणि डेव्हीड जॉन फेंस्टीन कंपनीचे संचालक आहेत. तनेजा टेस्लाचे सीईओ आहेत. उर्वरीत दोघे संचालक पदावर आहेत. कंपनी भारतात मॉडेल ३ लाँच करण्याची शक्यता आहे. या वर्षीच्या पहिल्या तिमाहीत या कारची विक्री सुरु होऊ शकते.

टेस्लाने अधिकृतरित्या भारतीय बाजारात प्रवेश केला आहे. टेस्लाने टेस्ला इंडिया मोटर्स अँड एनर्जी प्राइवेट लिमिटेड (Tesla India Motors and Energy Pvt Ltd with RoC Bangalore) या नावे रजिस्ट्रेशन केले असून भारतीय बाजारात लक्झरी इलेक्ट्रीक कारचे उत्पादन आणि विक्री करण्यात येणार आहे. असे बोलले जाते, की टेस्ला कारची आयात चीनवरून करण्याची शक्यता आहे आणि त्या ऑनलाईनच विकेल. डिलरशिपच्या माध्यमाने कारची विक्री होणार नाही. या कारची किंमत 55 लाख रुपये एवढी असेल, ही अफवा आहे.

नितीन गडकरी यांनी देशातील इलेक्ट्रिकल कारच्या आवश्यकतेवर भाष्य केले. ते म्हणाले, अनेक भारतीय कंपन्या इलेक्ट्रिकल गाड्यांवर काम करत आहेत. ज्यांच्या गाड्यांची किंमती कमी होऊ शकते. मात्र, तांत्रिकदृष्ट्या टेस्ला फार प्रगत आहे.