Brahmos : ब्रह्मोसचे लॉन्ग रेंज वर्जन प्रक्षेपणादरम्यान कोसळले

ब्रह्मोस क्षेपणास्त्रांच्या प्रकारातील एक अत्यंत विश्वसनीय क्षेपणास्त्र आहे. आणि त्याच्या चाचणीत अपयशाच्या घटना फारच कमी आहेत. प्राथमिक तपासणीत क्षेपणास्त्राच्या प्रक्षेपणात काही अडचणी आल्यामुळे चाचणी अयशस्वी झाल्याचे दिसून आले आहे.

    देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने महत्वाच्या ब्रह्मोस सुपरसोनिक क्रूज मिसाइलच्या अपयशाच्या कारणांचे विश्लेषण संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO) आणि ब्रह्मोस एअरस्पेस कॉर्पोरेशनच्या वैज्ञानिकांच्या एका टिम द्वारे करण्यात येणार आहे.

    ब्रह्मोस सुपरसोनिक क्रूस मिसाइलचे परिक्षण सोमवारी ओडिशातील किनाऱ्यावरपरीक्षण करण्यात आले. प्रक्षेपणानंतर नंतर लगेचच ही मिसाईल जमिनीवर कोसळल्याने ती अपयशी ठरली. या मिसाइलची मारक क्षमता 450 किलोमीटर पर्यंत होती. सोमवारी सकाळी याच क्षमतेच्या परीक्षणा दरम्यान हे मिसाईल हवेत काही अंतरावर झेपावल्यानंतर जमिनीवर कोसळले. त्यामुळे आता या मिसाईलचे परीक्षण का अपयशी ठरले? याची चौकशी डीआरडीओ आणि ब्रह्मोस एअर स्पेस कॉर्पोरेशनच्या वैज्ञानिकांची टीम करणार आहे.

    ब्रह्मोस क्षेपणास्त्रांच्या प्रकारातील एक अत्यंत विश्वसनीय क्षेपणास्त्र आहे. आणि त्याच्या चाचणीत अपयशाच्या घटना फारच कमी आहेत. प्राथमिक तपासणीत क्षेपणास्त्राच्या प्रक्षेपणात काही अडचणी आल्यामुळे चाचणी अयशस्वी झाल्याचे दिसून आले आहे.

    दरम्यान, यापूर्वी ब्राह्मोस क्षेपणास्त्र 300 किमी पेक्षा कमी अंतरावरील लक्षावर मारा करण्यासाठी वापरलं जात असे. ब्रह्मोस सुपरसोनिक क्षेपणास्त्र भारताच्या ब्रह्मपुत्र नदी आणि रशियाच्या मोसकवा नदी या दोन नद्यांच्या नावावर आहे. ब्रह्मोस हे जगातील एकमेव क्षेपणास्त्र आहे जे जमीन, हवा आणि पाणी या तिन्ही ठिकाणाहून लॉन्च केले जाऊ शकते.