Mamta Banerjee PHoto

बंगाल विधानसभेची निवडणूक आता रोमांचक वळणार पोहोचण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रथमच महापुरुषांच्या नावाला वेगही आला आहे. भाजपा असो वा तृणमूल, आपले स्थान निर्माण करण्यासाठी दोन्ही पक्ष थोर पुरुषांची नावे घेत आहेत. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावे किंवा महापुरुषांच्या नावाने निवडणूक लढाई लढणार की नाही याबद्दल सर्वसामान्य लोक संभ्रमात पडले आहेत.

कोलकाता. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी कोणाचेही नाव न घेता केंद्रातील भाजपा नेत्यांवर तोफ डागली. देशाचे विभाजन होऊ देणार नाही आणि लोकांसाठीच काम करत राहणार, त्यांच्यासाठीच जगणार आणि मरणार असल्याचे त्या म्हणाल्या. कोलकातातील बाबूघाट भागात गंगासागर यात्रेकरूंसाठी विश्रांती शिबिराचे उद्घाटन करताना त्या बोलत होत्या. महान नेते सर्व लोकांना समान वागणूक देतात असेही त्या यावेळी म्हणाल्या.

विवेकानंदांचे केले स्मरण

तृणमूल काँग्रेस अध्यक्षा म्हणाल्या की स्वातंत्र्यापासून देशाला अनेक अडचणींचा सामना करावा लागला परंतु देशाचे विभाजन झाले नाही. आम्ही देशाचे विभाजन होऊ देणार नाही. स्वामी विवेकानंद यांचे स्मरण करताना भारतात शेतकरी, परीट आणि दलित सर्वच वर्गातील नेते असतील असे म्हटले होते याचा दाखलाही दिला.

महापुरुषांच्या नावाने धरला जोर

बंगाल विधानसभेची निवडणूक आता रोमांचक वळणार पोहोचण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रथमच महापुरुषांच्या नावाला वेगही आला आहे. भाजपा असो वा तृणमूल, आपले स्थान निर्माण करण्यासाठी दोन्ही पक्ष थोर पुरुषांची नावे घेत आहेत. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावे किंवा महापुरुषांच्या नावाने निवडणूक लढाई लढणार की नाही याबद्दल सर्वसामान्य लोक संभ्रमात पडले आहेत. युगपुरुष स्वामी विवेकानंद, नेताजी सुभाषचंद्र बोस, कविगुरु रवींद्रनाथ टागोर यांचे दाखले देत नेत्यांनी प्रचार सुरू केला आहे. महापुरुषांच्या नावावर आपली राजकीय पाळेमुळे मजबूत करण्याचा त्यांचा प्रयत्नही सुरू आहे.

——-

शुभेंदूंच्या वडिलांना टीएमसीचा दणका

तृणमूल काँग्रेसने वरिष्ठ खासदार आणि भाजपा नेते शुभेंदू अधिकारी यांचे वडिल शिशिर अधिकारी यांना जबर दणका दिला आहे. शंकरपूर विकास प्राधिकरणाच्या अध्यक्षपदावरून तृणमूल काँग्रेसने त्यांची हकालपट्टी केली. त्यांच्या जागी आमदार अखिल गिरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अखिल गिरी हे शुभेंदू अधिकारी यांचे विरोधक मानले जातात. शिशिर अधिकारी यांनी डीएसडीए अध्यक्षपदी असताना कोणतेही काम केलेले नाही अशी टीका त्यांनी केली. दरम्यान अधिकारी यांनी तृणमूल काँग्रेसने वाटेल ते करावे मी कशाला त्रास करून घेऊ अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.