When will Indians get corona vaccine? How much will it cost? Important information was given by Adar Punawala of Siram Institute

या लशीच्या निर्मितीसाठी सीरम इन्स्टिट्यूटनं नोवावॅक्स या कंपनीशी करारही केला आहे. मात्र प्रत्यक्षात सामान्य लोकांपर्यंत ही लस पोहोचेपर्यंत किमान काही महिने जाऊ शकतात. सध्या या लशीच्या भारतातील चाचण्यांना सुरुवात झाली असून, सप्टेंबरपर्यंत ती लसीकरणासाठी उपलब्ध होईल- आदर पूनावाला

    भारतामध्ये कोरोनावरील कोव्होवॅक्स लशीच्या चाचणीला सुरूवात झाली असल्याची माहिती सीरम इन्स्टिट्यूटचे प्रमुख आदर पूनावाला यांनी दिली आहे.
    नोव्हाव्हॅक्स आणि सीरम इन्स्टिट्यूट मिळून कोव्होवॅक्स (Covovax) लशीची निर्मिती करत आहेत. आणि ही लस कोरोनाच्या नवीन व्हेरियंटवरही परिणाम कारक ठरेल असे ट्वीट सीरम इन्स्टिट्यूटचे प्रमुख अदर पूनावालांनी केले आहे.

    “नोव्हावॅक्ससोबत संयुक्त भागीदारीमध्ये सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया कोव्होवॅक्सची निर्मिती करत आहे. आफ्रिका आणि युकेमध्ये सापडलेल्या कोव्हिड १९ च्या नवीन व्हेरिएंटवरही या लशीची चाचणी करण्यात आली आहे. ही लस जवळपास ८९ टक्के परिणामकारक ठरली आहे.” असे आदर यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे. ,

    अमेरिकेतली बॉयोटेक कंपनी नोवावॅक्सनं ही लस तयार केली आहे. NVX-CoV2373 असं या लशीचे मूळ वैज्ञानिक नाव आहे. ही लस कोव्हिडच्या मूळ कोरोनाविषाणूविरोधात ९६. ४ टक्के काम करत असल्याचे युकेमध्ये झालेल्या तिसऱ्या फेजच्या चाचण्यांमध्ये दिसून आले आहेत. तसेच च युके आणि दक्षिण आफ्रिकेत आढळून आलेल्या नव्या कोरोना विषाणूला रोखण्यातही ही लस यशस्वी ठरत असून, तिची एकूण परिणामकारकता ९० टक्के असल्याचे कंपनीने जाहीर केले आहे.

    जानेवारीमध्ये यासंदर्भातली माहिती कंपनीनं जाहीर केली होती. या लशीच्या निर्मितीसाठी सीरम इन्स्टिट्यूटनं नोवावॅक्स या कंपनीशी करारही केला आहे. मात्र प्रत्यक्षात सामान्य लोकांपर्यंत ही लस पोहोचेपर्यंत किमान काही महिने जाऊ शकतात. सध्या या लशीच्या भारतातील चाचण्यांना सुरुवात झाली असून, सप्टेंबरपर्यंत ती लसीकरणासाठी उपलब्ध होईल अशी आशा आदर पूनावाला यांनी व्यक्त केली आहे.