हद्दच झाली ! चक्क पंतप्रधान मोदींच्या नावे होतेय तरुणांची फसवणूक ; वेळीच सावध व्हा आणि जाणून घ्या काय आहे प्रकार

सध्या मोदी सरकारच्या नावाने तरुणांना आपल्या जाळ्यात अडकवलं जात आहे. नोकरी देण्याच्या बहाण्याने त्यांच्याकडून अर्जासाठी काही पैसे वसूल केले जात आहे. पीएम रोजगार योजनेची फेक वेबसाईट बनवून त्या माध्यमातून फसवणूक केली जात आहे.

  नवी दिल्ली : अनेकदा नागरिकांची सोशल मीडियाच्या माध्यमातून फसवणूक झाल्याच्या घटना आपण वाचतो. मात्र आता तर फसवणुकीचा असा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे की सगळ्यांनी वेळीच सावध व्हायला हवे. तर प्रकरण हे आहे की चक्क पंतप्रधान मोदी सरकारच्या नावाने तरुणांना आपल्या जाळ्यात अडकवलं जात आहे. नोकरी देण्याच्या बहाण्याने त्यांच्याकडून अर्जासाठी काही पैसे वसूल केले जात आहे. पीएम रोजगार योजनेची फेक वेबसाईट बनवून त्या माध्यमातून फसवणूक केली जात आहे.

  काय आहे प्रकरण
  सध्या देशाला कोरोना महामारीने ग्रासले आहे. अशातच मागील दोन वर्षांपासून लॉकडाऊन आणि कोरोनामुळे नोकरी गमवाव्या लागल्या आहेत. या असा लोकांना रोजगार परत मिळवून देण्यासाठी सरकारतर्फे विविध योजना लाँच करण्यात आल्या आहेत. तसेच सरकारच्या वतीने गरजुंना, गरिबांना मदत करण्यात येत आहे. अनेक स्वयंसेवी संस्थांनीही लोकांना मदतीचा हात दिला आहे. अशातच सोशल मीडियावर अनेक अफवा पसरवणारे मेसेज हे व्हायरल होत आहेत. असाच एक मेसेज सध्या जोरदार व्हायरल होत आहे.

   

  या अशा प्रलोभनाला बळी पडू नका
  सध्या मोदी सरकारच्या नावाने तरुणांना आपल्या जाळ्यात अडकवलं जात आहे. नोकरी देण्याच्या बहाण्याने त्यांच्याकडून अर्जासाठी काही पैसे वसूल केले जात आहे. पीएम रोजगार योजनेची फेक वेबसाईट बनवून त्या माध्यमातून फसवणूक केली जात आहे.

  पीआयबी फॅक्ट चेकने केलेल्या ट्वीटमध्ये असं म्हटलं आहे की, https://pmrojgaaryojna.in या वेबसाईटच्या माध्यमातून विविध पदांसाठी अर्ज मागवले जात आहेत आणि १०० रुपये नोंदणी शुल्क मागितले जात आहे. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो देखील वापरण्यात आला आहे. प्रेस इन्फर्मेशन ब्युरोने (Press Information Bureau) व्हायरल होणारा हा मेसेज खोटा असल्याचं म्हटलं आहे. तसेच असून केंद्र सरकारने अशाप्रकारची कोणतीही घोषणा केलेली नाही असं स्पष्टीकरण पीआयबीने दिलं आहे. नोकरीच्या नावाने होणाऱ्या फसवणुकीला बळी पडू नका. अधिकृत वेबसाईटव्यतिरिक्त इतर कोणत्याही वेबसाईटवर क्लिक करणं टाळा. प्रेस इन्फोरमेशन ब्युरोने फॅक्ट चेक च्या माध्यमातून लोकांना सावध केलं आहे.