पीएम किसान योजनेचा 10 वा हप्ता ‘या’ तारखेपर्यंत जारी होणार, खात्यात येणार 2000 रुपये

शेतकऱ्यांना लवकरच आनंदाची बातमी मिळणार आहे. केंद्र सरकार 15 डिसेंबर 2021 पर्यंत पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा पुढील हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवण्याची योजना आखत आहे. सरकारने गेल्यावर्षी या कालावधीदरम्यानचा हप्ता 25 डिसेंबर रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवला होता. जर तुम्ही या योजनेचा लाभ घेण्यास पात्र असाल आणि तरी देखील आधीचा हप्ता तुम्हाला मिळाला नसेल तर अजूनही तुम्ही नोंदणी करून हा हप्ता मिळवू शकता.

    नवी दिल्ली : शेतकऱ्यांना लवकरच आनंदाची बातमी मिळणार आहे. तुम्ही जर पीएम शेतकरी सन्मान निधी योजनेचे लाभार्थी असाल तर ही तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. मीडिया अहवालांच्या मते पीएम शेतकरी सन्मान निधी योजनेचा दहावा हप्ता पाठवण्याची तारीख निश्चित करण्यात आली आहे. आतापर्यंत केंद्राने भारतातील 11.37 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात 1.58 लाख कोटी रुपये हंस्तांतरित केले आहेत.

    दरम्यान केंद्र सरकार 15 डिसेंबर 2021 पर्यंत पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा पुढील हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवण्याची योजना आखत आहे. सरकारने गेल्यावर्षी या कालावधीदरम्यानचा हप्ता 25 डिसेंबर रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवला होता.

    जर तुम्ही या योजनेचा लाभ घेण्यास पात्र असाल आणि तरी देखील आधीचा हप्ता तुम्हाला मिळाला नसेल तर अजूनही तुम्ही नोंदणी करून हा हप्ता मिळवू शकता. जारी होणाऱ्या पुढील हप्त्यासह तुम्हाला आधीच्या हप्त्याची रक्कमही मिळेल, अर्थात तुमच्या खात्यात 4000 रुपये जमा होतील. मात्र तुम्हाला याकरता 30 सप्टेंबरपूर्वी योजनेसाठी नोंदणी करावी लागेल.

    पीएम शेतकरी सन्मान निधी योजनेच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन तुम्हाला हे काम पूर्ण करावं लागेल. तुमचा अर्ज स्विकार झाल्यास तुम्हाला ऑक्टोबर महिन्यात 2000 रुपये आणि डिसेंबर महिन्यात पुढील महिन्याचे 2000 रुपये असे 4000 रुपये मिळतील. पीएम शेतकरी सन्मान निधी योजना देशातील गरीब शेतकऱ्यांना बी-बियाणं, खतं खरेदी करण्याकरता निधी मिळावा याकरता राबवली जाते. मोदी सरकार कडून पीएम शेतकरी सन्मान निधी या योजनेअंतर्गतदेशभरातील कोट्यवधी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 6000 रुपये तीन हप्त्यांमध्ये पाठवले जातात. 2000 रुपयांचे तीन हप्ते शेतकऱ्यांना पाठवले जातात.