हॉटेल, रेस्टॉरंट सुरु करण्याचा निर्णय आज होणार ? अनलॉक – ५ च्या घोषणेकडे हॉटेल व्यावसायिकांचे डोळे

येत्या १ ऑक्टोंबरपासून ( coming first october) देशात अनलॉक - ५  (unlock-5) च्या प्रक्रियेला सूरुवात होणार आहे. मात्र, या अनलॉक - ५ च्या प्रक्रियसोबतच हॉटेल (hotel), रेस्टॉरंट (restaurant) आणि पर्यंटन स्थळं (tourism place) सूरू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच आज या प्रक्रियेचा निर्णय होणार असल्याचं सांगतिलं जात आहे.

 नवी दिल्ली : देशात कोरोना रूग्णांच्या (corona virus) संख्येत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. तसेच देशातील अनलॉक-४ च्या (unlock-4) प्रक्रियेची मुदत उद्या ३० सप्टेंबर (30 september) रोजी संपणार आहे. त्यामुळे येत्या १ ऑक्टोंबरपासून ( coming first october) देशात अनलॉक – ५  (unlock-5) च्या प्रक्रियेला सूरुवात होणार आहे. मात्र, या अनलॉक – ५ च्या प्रक्रियसोबतच हॉटेल (hotel), रेस्टॉरंट (restaurant) आणि पर्यंटन स्थळं (tourism place) सूरू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच आज या प्रक्रियेचा निर्णय होणार असल्याचं सांगतिलं जात आहे.

अनलॉक – ४ मध्ये दिली या गोष्टींना परवागनी, तर अनलॉक – ५ मध्ये काय ?

अनलॉक ४ अंतर्गत देशातील अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी सरकारने अनेक नियम शिथिल केले होते. आज देखील सरकारकडून अनलॉक ५ अंतर्गत काही नियम शिथिल करण्याची परवानगी दिली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अनलॉक – ४ अंतर्गत मॉल, सलून, रेस्तराँ, व्यायमशाळा यांसारख्या गोष्टी सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. परंतु चित्रपटगृहे, जलतरण तलाव, मनोरंजन पार्क सुरु करण्यात आलेले नाही. त्यामुळे आता चित्रपटगृहांना आज सरकार परवानगी देईल का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

हिमाचल प्रदेश, उत्तराखंड याठिकाणी नियमांचे पालन करत पर्यटनाला मंजुरी दिली आहे. कोरोनामुळे देशातील पर्यटन पूर्णपणे बंद आहे. त्यामुळे अनलॉक – ५ अंतर्गत पर्यटन व्यवसायाला चालना देण्यासंदर्भात निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी अनेक नियम शिथिल करत १ ऑक्टोबरपासून चित्रपटगृहांना परवानगी दिली आहे. ५० पेक्षा कमी लोकांच्या उपस्थितीत १ ऑक्टोबर पासून नाटक, ओपन एअर थेअटर, चित्रपटगृह तसेच सर्व संगीताच्या कार्यक्रमांना १ ऑक्टोबरपासून परवानगी दिली जाऊ शकते.