‘त्या शेतकऱ्यांचा मृत्यू गोळी लागल्याने नाही तर अती रक्तस्त्राव झाल्याने’ शवविच्छेदन अहवालात खुलासा

सर्व मृतदेहांचे शवविच्छेदन सोमवारी (04 ऑक्टोबर) डॉक्टरांच्या पॅनेलद्वारे करण्यात आले, ज्याचा अहवाल संध्याकाळी उशिरा आला. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर कडक सुरक्षा व्यवस्थेमध्ये सर्वांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान, शेतकरी गुरविंदर सिंग यांचे अंतिम संस्कार थांबवण्यात आल्याच्या बातम्या येत आहेत.

    लखीमपूर हिंसाचारातील मृतांचा शवविच्छेदन अहवाल आज (मंगळवारी) आला आहे. शवविच्छेदन अहवालात म्हटले आहे की, आठही लोकांचा मृत्यू मुकामार, जास्त रक्तस्त्राव आणि ब्रेन हॅमरेजमुळे झाला आहे. त्यापैकी कोणाचाही मृत्यू गोळी लागल्याने झालेला नाही. त्यांच्या शरीरावर गोळ्यांच्या खुणा आढळल्या नाहीत. छत्र सिंह, दलजीत सिंग, लव्हप्रीत सिंग आणि गुरविंदर सिंग अशी मृत शेतकऱ्यांची नावे आहेत.

    केंद्रीय राज्यमंत्री अजय मिश्रा तेनी यांचा मुलगा आशिष मिश्रा याने चार शेतकऱ्यांपैकी एकाची हत्या केल्याचा दावा संयुक्त किसान मोर्चाने केला होता. इतर शेतकऱ्यांना वाहनांनी चिरडून ठार मारले. मात्र, शेतकऱ्यांच्या मृतदेहांचे शवविच्छेदन समोर आल्यानंतर गोळी मारल्याची चर्चा केवळ अफवा असल्याचे सिद्ध झाले आहे.

    उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथील हिंसाचारात चार शेतकऱ्यांसह आठ जणांचा बळी गेल्यामुळे देशभरात तीव्र पडसाद उमटत आहेत. लखीमपूर खेरी येथे रविवारी आंदोलक शेतकऱ्यांच्या जमावात मोटारी घुसवल्याने घडलेल्या हिंसाचारात चार शेतकऱ्यांसह आठ जणांचा मृत्यू झाला. त्यानंतर हिंसाचारामध्ये शेतकऱ्यांवर गोळ्याही झाडण्यात असा दावा करण्यात येत आहे. मात्र आता ठार झालेल्या चार शेतकऱ्यांचा शवविच्छेदन अहवाल आता समोर आला आहे. यातून मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांच्या मृतदेहावर गोळ्यांच्या कोणत्याही खुणा आढळल्या नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

    दरम्यान, सर्व मृतदेहांचे शवविच्छेदन सोमवारी (04 ऑक्टोबर) डॉक्टरांच्या पॅनेलद्वारे करण्यात आले, ज्याचा अहवाल संध्याकाळी उशिरा आला. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर कडक सुरक्षा व्यवस्थेमध्ये सर्वांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान, शेतकरी गुरविंदर सिंग यांचे अंतिम संस्कार थांबवण्यात आल्याच्या बातम्या येत आहेत. पीएम रिपोर्ट (पोस्टमॉर्टम) न मिळाल्याने अंत्यसंस्कार थांबवण्यात आले आहेत. शेतकऱ्यांचा आरोप आहे की गुरविंदर सिंग यांचा मृत्यू गोळ्या लागल्याने झाला. मात्र, पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये गोळ्या लागल्याचा उल्लेख नव्हता.