८ ऑक्टोबरला ‘हवाई बाहुबली’चं देशात आगमन होणार, सर्वसामान्य नागरिकांना शक्तीचे प्रदर्शन घडवणार

तुफानी वेगाने ( Full Speed) शत्रूंच्या मनात धडकी भरवणारे राफेल (Rafael Fighter Jet) लढाऊ जेट विमाने येत्या गुरुवार, ८ ऑक्टोबरला ‘भारतीय वायुदल दिन’ (Indian Air Force Day)  संचलनाच्या निमित्ताने देशातील जनतेला जाहीर दर्शन देणार आहेत.

तुफानी वेगाने ( Full Speed) शत्रूंच्या मनात धडकी भरवणारे राफेल (Rafael Fighter Jet) लढाऊ जेट विमाने येत्या गुरुवार, ८ ऑक्टोबरला ‘भारतीय वायुदल दिन’ (Indian Air Force Day)  संचलनाच्या निमित्ताने देशातील जनतेला जाहीर दर्शन देणार आहेत. भारतात आगमन झाल्यानंतर पहिल्यांदाच देशाचा हा ‘हवाई बाहुबली’ (Bahubali ) सर्वसामान्य नागरिकांना आपल्या शक्तीचे प्रदर्शन घडवणार आहे.

अफाट वेग, प्रचंड ताकद, तुफानी मारक क्षमता आणि मोठय़ा संख्येने अण्वस्त्र वाहून नेण्याची क्षमता यामुळे हवाई युद्धात राफेल जेटची भीती शत्रूला वाटते. राफेलच्या समावेशाने भारतीय वायुदलाचे सामर्थ्य अनेकपटीने वाढले आहे. भारताच्या लडाखी सीमेवर सध्या चीनच्या कुरापतींमुळे वातावरण तणावपूर्ण आहे.

जगातील सर्वात उंच युद्धभूमीवरील युद्धात हायटेक राफेल अतिशय निर्णायक आणि प्रभावी कामगिरी बजावू शकतात. त्यामुळे भारतीय हवाई दलाने आपल्या ताफ्यात नव्याने सामील झालेली राफेल जेट चीनने आक्रमणाची आगळीक केल्यास प्रत्युत्तरासाठी सज्ज ठेवली आहेत. फ्रान्सकडून विकत घेतलेले राफेल हे दोन इंजिनांचे हायटेक लढाऊ विमान ४.५ जनरेशनचे जेट मानले जाते. हवाई युद्धातील अजेय योद्धा म्हणून या विमानाची ख्याती आहे.