मार्चमध्ये बँकेला असणार ११ दिवसांची सुट्टी, ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; कोणत्या दिवशी राहणार बँका बंद?

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (RBI) हॉलिडे कॅलेंडरनुसार, मार्चमध्ये होळी आणि महाशिवरात्रीसह एकूण ११ दिवस बँकांना सुट्टी असेल. यापैकी ५ मार्च, ११ मार्च, २२ मार्च, २९ मार्च आणि ३० मार्च रोजी बँकांना सुट्टी असेल. त्याशिवाय ४ रविवार आणि २ शनिवारीही बँका बंद राहतील. म्हणजेच मार्च महिन्यात एकूण ११ दिवस बँकांमध्ये काम होणार नाही.

    नवी दिल्ली: जर आपण पुढच्या महिन्यासाठी म्हणजेच मार्चसाठी बँकेशी संबंधित कोणतीही कामं करण्याचा किंवा या महिन्यातील कामे पुढे ढकलण्याचा विचार करत असल्यास कॅलेंडर एकदा नक्कीच पाहा. कारण पुढच्या महिन्यात आपण ज्या दिवशी बँकेत जाण्याचा विचार करीत आहात, त्या दिवशी बँक बंद तर नाही ना, याची आताच खातरजमा करून घ्या. त्यामुळेच मार्चमध्ये कोणत्या दिवशी बँका बंद राहतील ही माहिती आम्ही तुम्हाला देत आहोत. देशातील सर्व बँकांना ही 11 दिवसांची सुट्टी राहणार आहे. फक्त वेगवेगळ्या राज्यात या सुट्ट्या वेगवेगळ्या दिवशी असतील.

    मार्चमध्ये बँका ११ दिवस बंद राहतील

    रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (RBI) हॉलिडे कॅलेंडरनुसार, मार्चमध्ये होळी आणि महाशिवरात्रीसह एकूण ११ दिवस बँकांना सुट्टी असेल. यापैकी ५ मार्च, ११ मार्च, २२ मार्च, २९ मार्च आणि ३० मार्च रोजी बँकांना सुट्टी असेल. त्याशिवाय ४ रविवार आणि २ शनिवारीही बँका बंद राहतील. म्हणजेच मार्च महिन्यात एकूण ११ दिवस बँकांमध्ये काम होणार नाही.

    ५ मार्च, शुक्रवार, फक्त मिझोरममध्ये सुट्टी
    ७ मार्च, रविवार
    ११ मार्च, गुरुवार, महाशिवरात्री
    १३ मार्च, दुसरा शनिवार
    १४ मार्च, रविवार
    २१ मार्च, रविवार
    २२ मार्च, सोमवार, बिहार दिन, फक्त बिहारमध्ये सुटी
    २७ मार्च, चौथा शनिवार
    २८ मार्च, रविवार, होळी
    २९ मार्च, सोमवार, धूलिवंदन
    ३० मार्च, मंगळवार, राजस्थान दिवस