आनंदाची बातमी! महागाई भत्त्याबाबत केंद्रीय कर्मचाऱ्यांना खूशखबर मिळण्याची शक्यता, होळीपूर्वी केंद्र सरकार करणार मोठी घोषणा

कोरोनामुळे केंद्र सरकारने महागाई भत्ता त्वरीत थांबविला होता. जुलै २०२१ पर्यंत हा भत्ता थांबविण्यात आला आहे. असा विश्वास आहे की होळी होण्यापूर्वी याची पुन्हा स्थापना करण्याची घोषणा केली जाईल. सध्या केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना महागाई भत्ता १७ टक्के आहे. अशा परिस्थितीत ही घोषणा झाल्यास महागाई भत्ता २१ टक्क्यांपर्यंत पोहोचेल.

    नवी दिल्ली : महागाई भत्त्याबाबत केंद्रीय कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारकडून खूशखबर मिळण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार, होळीआधीच केंद्र सरकारच्या ५२ लाख कर्मचारी आणि ६० लाख निवृत्ती वेतन धारकांसाठी घोषणा करण्यात आली आहे. या कर्मचाऱ्यांचे आणि पेंशन धारकांचा महागाई भत्ता जानेवारी २०२१ पासून प्रलंबित आहे. त्यामुळे नोकरीमध्ये असलेल्यांना महागडा भत्ता मिळतो अर्थात महागाई भत्ता मिळतो आणि निवृत्तीवेतनधारकांना महागाईपासून मुक्ततेसाठी महागाई सवलत मिळते.

    कोरोनामुळे केंद्र सरकारने महागाई भत्ता त्वरीत थांबविला होता. जुलै २०२१ पर्यंत हा भत्ता थांबविण्यात आला आहे. असा विश्वास आहे की होळी होण्यापूर्वी याची पुन्हा स्थापना करण्याची घोषणा केली जाईल. सध्या केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना महागाई भत्ता १७ टक्के आहे. अशा परिस्थितीत ही घोषणा झाल्यास महागाई भत्ता २१ टक्क्यांपर्यंत पोहोचेल.

    सरकारने महागाई भत्त्याची घोषणा केल्यास सरकारी तिजोरीवर १२५१० कोटींचा भार आणि महागाई सवलतीसाठी १४५९५ कोटी इतका होईल. याचा फायदा ५२ लाख कर्मचारी व ६० लाख निवृत्तीवेतनधारकांना होणार आहे. केंद्र सरकार वर्षातून दोनदा महागाई भत्ता देते. डीए वाढविण्याचा शेवटचा प्रस्ताव जानेवारी २०२० मध्ये करण्यात आला होता आणि मार्च २०२० मध्ये केंद्रीय मंत्रिमंडळाने त्याला मंजुरी दिली होती. त्यानुसार ४ टक्के महागाई भत्ता वाढणार आहे.